Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मी सारथीचा लाभार्थी या कार्यक्रमाचे तळेगाव घाट येथे चावडी वाचन.

बर्दापूर प्रतिनिधी - छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे, या संस्थेकडून महाराष्ट्रातील ग्रामपंचायत स्तरावर चाव

प्रा.डॉ.रामकृष्ण बदने यांची विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार मंडळ सदस्य पदी निवड
बर्नार्ड अर्नॉल्ट जगातील सर्वाधिक श्रीमंत
जागतिक विमा परिषदेसाठी धनश्री कडलग यांची निवड

बर्दापूर प्रतिनिधी – छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे, या संस्थेकडून महाराष्ट्रातील ग्रामपंचायत स्तरावर चावडी वाचन करून सारथीच्या उपक्रमांची माहिती ग्राम स्तरावर पोहोचवण्याचे नियोजन 15ऑगस्ट रोजी करण्यात आले होते  15ऑगस्ट रोजी मौजे तळेगाव येथील  ग्रामसभेत  सागर गणपत  यादव यांच्याकडून सारथीच्या उपक्रमांचे चावडी वाचन करून सारथीच्या उपक्रमांची माहिती देण्यात आली  महाराष्ट्र सरकारच्या स्वायत्त संस्थेद्वारा मराठा, हिंदू-मराठा, कुणबी-मराठा समाजासाठी राबविल्या जाणार्‍या विविध योजनांची माहिती ग्रामपंचायत स्तरावर चावडी वाचन करून महाराष्ट्रभर  पोहोचवण्याचे निर्देश विद्यार्थ्यांना  दिले गेले होते . सारथी चे  मा.व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी दिलेल्या निर्दशाप्रमाणे सारथी संस्थेची माहिती तळागळातील लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी  सागर गणपत यादव यांनी  तळेगाव घाट येथे मी सारथीचा लाभार्थी  या कर्तव्य भावनेतून सारथी कडून मराठा, हिंदू- मराठा , कुणबी – मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या व समाजाच्या उन्नतीसाठी राबविल्या जाणार्‍या नावीन्यपूर्ण उपक्रमाची माहिती  दिली . ग्रामीण भागातील आर्थिक दुर्बल मराठा समाजातील विद्यार्थी, स्थानिक समाजातील लोक, महिलावर्ग, शेतकरी आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्यापर्यंत सारथी योजनांची माहिती  पोहोचवण्याचं काम या उपक्रमातून झाले.
महाराष्ट्र राज्यातील मराठा ,कुणबी, मराठा – कुणबी व कुणबी -मराठा या लक्षित गटातील समाजाची सामाजिक ,शैक्षणिक व आर्थिक परिस्थिती विकसित करून  त्यांचा  शिक्षणाचा विकास  रथ चालविण्याचा काम सारथी संस्था  करत आहे. मराठा , हिंदू मराठा , कुणबी मराठा  समाजातील विविध समस्यावर जाणीव जागृती करून विशेष व पथदर्शी प्रकल्प सारथी कडून  वेळोवेळी हाती घेण्यात येत आहेत. सद्यस्थितीत लक्षित गटातील इच्छुक विद्यार्थ्यांना सारथी संस्थेमार्फत पोलीस भरती करता निशुल्क ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन शिष्यवृत्ती अंतर्गत एम.फील व पीएच.डी. करणार्‍या विद्याथ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येत आहे .छत्रपती शिवाजी महाराज स्मृती ग्रंथाच्या 5000 प्रतींची छपाई बालभारती या संस्थेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. मराठा , हिंदू मराठा, कुणबी मराठा गटातील  इच्छुक विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या दृष्टीने परिक्षेच्या तयारीसाठी विद्यावेतन देण्यात येत आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा 2020करिता लक्षित गटातील 59 विद्यार्थ्यांची झूम मीटिंग च्या माध्यमातून मुलाखत तयारी व अभिरूप मुलाखती घेण्यात आल्या आहेत.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दुय्यम सेवा गट ब (अराजपत्रित) परीक्षेसाठी लक्षित गटातील विद्यार्थ्यांना निशुल्क ऑनलाईन प्रशिक्षण सारथी संस्थेमार्फत घेण्यात येणार आहे.महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा स्पर्धा परीक्षा तयारी करिता 250 विद्यार्थ्यांची निवड करण्याची प्रक्रिया सद्यस्थितीत चालू आहे.कर्मचारी निवड आयोग मार्फत अराजपत्रित पदांच्या स्पर्धा परीक्षेला बसलेल्या मराठा , हिंदू मराठा कुणबी मराठा,  गटातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण घेण्याची कार्यवाही प्रस्तावित आहे.कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम संपूर्ण राज्यभर संस्थेच्या माध्यमातून राबविण्याची कार्यवाही सुरू आहे. तसेच लक्षित गटाला सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी संशोधन करून माहितीचे संकलन व पृथ्थकरण करणारी शिखर संस्था म्हणून सारथी संस्था कार्यरत आहे .अशी माहिती सागर गणपत यादव यांनी ग्रामसभेत चावडी वाचन करीत असताना  दिली.  यावेळी सरपंच ज्योतीताई यादव ग्रामविकास अधिकारी श्री . शेख ए.आर ,  सहकारी सोसायटी चे चेअरमन श्री. गोविंदराव प्रभाकर यादव ,  गावातील आशा वर्कर सौ. शारदा गणपत  यादव तसेच  जि. प. प्रा. शाळेचे मुख्याध्यापक आगलावे सर यांची प्रमुख  उपस्थिती होती .तसेच  या ग्रामसभेत मोठ्या प्रमाणात गावातील विद्यार्थी , ज्येष्ठ नागरिक , महिलावर्ग , शेतकरी व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

COMMENTS