दान- धर्म आणि राजे

Homeताज्या बातम्यासंपादकीय

दान- धर्म आणि राजे

रक्तदान हे सर्वस्रेष्ठ दान आहे हे मान्य. पण, दान करणे हा प्रत्येकाचा धर्म आहे हे चुकीचे. दान करावे असे प्रत्येक धर्माने सांगितले आहे. पण ते कुणाला कर

बंद कारखान्यांचे भूखंड ताब्यात घेण्याबाबत काय कारवाई केली ?
अजित पवारांचा पक्षासह चिन्हावर दावा
सिन्नर बाजार समितीत आमदार कोकाटेंना झटका 

रक्तदान हे सर्वस्रेष्ठ दान आहे हे मान्य. पण, दान करणे हा प्रत्येकाचा धर्म आहे हे चुकीचे. दान करावे असे प्रत्येक धर्माने सांगितले आहे. पण ते कुणाला करावे? आणि का करावे? आपल्याकडे देवाला दान करण्याची एक परंपरा आहे. भिकाऱ्याला दान करणे हे योग्यच…? देवाला दान करण्याची खरंच गरज आहे का…?  किंबहुना देव एवढे भिकारी असतात का की, त्यांना दान केल्याशिवाय त्यांचे पानही हालू शकत नाही. आता ज्ञानदान हे सुद्धा सर्वस्रेष्ठ दान आहे. मग धर्माने प्रत्येकाचा ज्ञानार्जनाचा अधिकार नाकारला होता त्याचे काय? एकलव्याच्या अंगठ्याची गोष्ट हे त्यासाठीचे उत्तम उदाहरण. ‘दानधर्म करा’ असे बोगस विधाने किर्तन, प्रवचन आदींच्या माध्यमातून बुवा, महाराज करत असतात.
आपल्याकडे ब्राम्हणांना दान करण्याची एक पद्धत आहे. असे दान जो देतो किंवा घेतो त्यात दोघांचाही स्वार्थ असतो. दान देणारा इच्छापूर्तीसाठी दान करतो. तर, इच्छापूर्ती किंबहुना मनोकामना पूर्ण कारण्यापोटी आशीर्वाद देणारा दान घेतो. हा जो व्यवहार आहे तो तसा भ्रष्ट आहे. या व्यवहाराला आपण लाच देणे आणि घेणे असे देखील म्हणू शकतो. उदा. मुलं व्हावेत म्हणून लोक देवाला बकरे, कोंबडे, पेडा, नारळ याचा नवस करतात. मुलं झाल्यावर ते नवस फेडतात. याची सैद्धांतिक चिकित्सा केल्यावर देवाला बकरे, कोंबडे, पेडा, नारळ हे लाच म्हणूनच दिले जाते हा त्यातून निघणारा सिद्धांत आहे. मग देव लाचखोर आहे का? असो, पूर्वी राजे- महाराजे प्रचंड दानशूर होते.
त्यापैकीच छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज हे आहेत. रामायण, महाभारतात विविध राजांचे दानशूराचे दाखले दिले जातात. हे राजे शूरवीर होते, दानशूर होते, न्यायी होते. पण महान, पराक्रमी राज्यांची परंपरा आपल्याला लाभली असली तरी रयतेचा राजा असं म्हटलं की, समोर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं कुठलं नाव येत नाही. रयतेचा राजा कसा असावा याचा पायंडा छत्रपतींनी रचला आणि त्यापुढे जाण्याची कोणाची हिम्मत नाही. सध्या सोशल मिडीयावर छत्रपती उदयनराजे भोसले यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. रस्त्यावर उन्हात उभं राहून पुस्तकं, कॅलेंडर विकणाऱ्या मुलीला मदत करण्यासाठी उदयनराजे यांनी गाडी थांबवून तिच्याकडून सर्व पुस्तके, कॅलेंडर विकत घेतले. किंबहुना त्या पुस्तके, कॅलेंडरच्या मूळ किमतीपेक्षा जास्त पैसे दिले. मुद्दा हा आहे की, हे सगळं घडत असतांना त्याचा व्हिडीओ काढण्याची गरज होती का?  त्यांचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. फक्त यासाठीच पुस्तके, कॅलेंडर विकत घेतले का? बरं, ते पुस्तके, कॅलेंडर शेजारच्या अनाथ आश्रमात देण्याचे उदयनराजे भोसले यांनी सांगितले. ते ठीक. पण, पुस्तके, कॅलेंडर विकणाऱ्या त्या मुलीची समस्या काय होती? ती कशासाठी हे काम करत होती हे राजेंनी विचारण्याची गरज होती. तशी छत्रपतीचीं परंपरा आहे. त्या मुलीच्या समस्येचे निराकरण उदयनराजे करू शकले नाहीत हे कुणालाही नाकारता येणारे नाही. आता त्या मुलीच्या समस्या निवारणासाठी छत्रपती उदयनराजे भोसले मोठे दान करू शकत होते. हा त्यांचा धर्म आहे. पण त्यांनी ते केलेच पाहिजे असाही आपला दावा नाही. तो त्यांचा प्रश्न आहे. हजार दोन हजार रुपये देऊन राजे यांनी सोशल मिडीयावर आपुलकी निर्माण केली खरी पण त्या मुलीची योग्य दाखल घेतली नाही. असे हे दान- धर्म आणि राजे… 

COMMENTS