श्रीरामपूर/प्रतिनिधी ःसुखदेव सुकळे यांनी विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे आध्यत्मिक कार्यातील उच्चतम व्यक्तिमत्व आचार्य डॉ. शुभम महाराज कांड
श्रीरामपूर/प्रतिनिधी ःसुखदेव सुकळे यांनी विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे आध्यत्मिक कार्यातील उच्चतम व्यक्तिमत्व आचार्य डॉ. शुभम महाराज कांडेकर आणि मुंबई येथील समाजप्रबोधनकार चैताली खटी यांना दिलेले पुरस्कार आणि साक्षात्कारी संत काशिनाथ महाराज ग्रन्थप्रकाशन सोहळा हेच सेवाशील व्यक्तीचे खरे पुण्यस्मरण होय,असे विचार महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर येथील विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे साईसुधा काळे रसवंतीच्या व्यासपीठावर आयोजित पुस्तक प्रकाशन आणि राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून काका कोयटे बोलत होते.अध्यक्षस्थानी अड, रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष माजी प्राचार्य टी.ई. शेळके होते. मान्यवरांनी दीपप्रज्ज्वलन व प्रतिमापूजन केले. प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. प्रतिष्ठानचे समन्वयक, मार्गदर्शक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.सुखदेव सुकळे यांनी संपादित केलेला साक्षात्कारी संत काशिनाथ महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित ’उसगावचा संतमहिमा’ ह्या गौरव पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांनी केले.काका कोयटे व मान्यवरांनी पुरस्कार वितरण केले. संगीता फासाटे यांनी मानपत्राचे वाचन केले.साक्षात्कारी संत काशिनाथ महाराज स्मृती राज्यस्तरीय पुरस्कार लोकप्रिय प्रवचनकार, कीर्तनकार ह. भ. प.आचार्य डॉ. शुभम महाराज कांडेकर यांना देण्यात आला. तर स्व. पुष्पा सुखदेव सुकळे स्मृती राज्यस्तरीय पुरस्कार मुंबई येथील समाजप्रबोधनकार सौ. चैताली विजय खटी यांना प्रदान करण्यात आला. व्यासपीठावर काका कोयटे, प्राचार्य टी. ई. शेळके,आचार्य डॉ. शुभम महाराज कांडेकर, चैताली खटी, विजय खटी, प्राचार्य शन्करराव अनारसे, सुखदेव सुकळे, डॉ. बाबुराव उपाध्ये, चंद्रपूर जिल्ह्यातील उसगाव येथील साक्षात्कारी संत काशिनाथ महाराज संस्थानचे अध्यक्ष पांडुरंग वासेकर, साहेबराव सुकळे उपस्थित होते.काका कोयटे यांनी आपल्या भाषणात पुढे सांगितले की, सुखदेव सुकळे यांची पत्नी पुष्पाताई सुकळे यांचे 10जुलै 2022रोजी निधन झाले, त्यांचा कोणताही धार्मिक अनावश्यक विधी न करता सेवाभावी पुरस्कार देणे आणि पुस्तक प्रकाशनासारखा समाजप्रबोधक कार्यक्रम घेतला. सत्कार्याचे सत्कार करून सत्कार्याला प्रेरणा दिली, असे कोणतेही वर्षश्राद्धरुपी विधी न करता सत्कार्यरुपी पुण्यस्मरण करणे हा आदर्श आपण प्रथमच पाहत आहोत, मी शक्यतो धार्मिक उपक्रमाला जात नाही पण आचार्य डॉ. शुभम महाराज कांडेकर आणि सौ. चैतालीताई खटी यांच्यासारख्या समाजप्रबोधन कार्यात समर्पित झालेल्या उत्तुंग व्यक्तिमत्वांची दर्शनभेट आणि जीवनचिंतन ऐकण्यासाठी आपण आलो. पुरस्कारप्राप्त आचार्य डॉ. शुभम महाराज कांडेकर,सौ. चैताली खटी,उसगावचे पांडुरंग वासेकर,पत्रकार स्वामीराज कुलथे यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य टी. ई. शेळके यांनी अध्यक्ष भाषणातून विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानच्या निरपेक्ष सेवाकार्याचा गौरव करून काका कोयटे, पुरस्कारविजेते आणि सुखदेव सुकळे यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले.कार्यक्रमास श्रीरामपूर परिसरातील जेष्ठ नागरिक, विविध मान्यवर तसेच उसगावचे सेवासमितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.अनेकांनी सत्कारमूर्ती, संयोजक यांचे सत्कार केले. सूत्रसंचालन कवयित्री संगीता फासाटे, कटारे यांनी केले तर सुदामराव औताडे पाटील यांनी आभार मानले.
COMMENTS