कोपरगाव प्रतिनिधी ः हिंदू देवता शास्त्रात तसेच समाजजीवनात गौरी हे शिवाच्या शक्तीचे आणि गणेशाच्या आईचे रूप मानले गेले आहे अपराजितपृच्छा या ग्रंथाम
कोपरगाव प्रतिनिधी ः हिंदू देवता शास्त्रात तसेच समाजजीवनात गौरी हे शिवाच्या शक्तीचे आणि गणेशाच्या आईचे रूप मानले गेले आहे अपराजितपृच्छा या ग्रंथामध्ये द्वादशगौरीचा उल्लेख येतो तसेच अग्निपुरामध्ये गौरी मूर्तीचे सामूहिक पूजन केले जाई असे सांगितले आहे गौरी पूजन व महालक्ष्मी पूजन हे हिंदू महिलांचा भाद्रपद महिन्यातील गौरीपूजन हा संबंध राज्यातील सणांपैकी एक महत्त्वाचा सण म्हणून श्री गणेशाच्या आगमनानंतर सर्वत्र मोठ्या जल्लोषात साजरा केला जात असतो.
याही वर्षी मंगळवार दि 19 सप्टेंबर रोजी श्री गणरायाच्या आगमनानंतर गुरुवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी घराघरात गौरीची मोठ्या थाटामाटात व वेगळ्या पद्धतीने सजावट करत स्थापना करण्यात आली यात कोपरगाव शहरातील श्री कन्सल्टिंग चे सर्वेसर्वा व कमलाताई बाळासाहेब सातभाई ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य विशाल धारणगावकर हे गेल्या 30 वर्षापासून आपल्या घरात मोठ्या थाटामाटात वेगवेगळ्या पद्धतीने सजावट करत गौराईची स्थापना करत असतात याही वर्षी त्यांनी आपल्या घरात गौराईची स्थापना केली असून त्यांनी या वेळीं नुकतीच भारताने बहुचर्चित अशा चंद्रयान्-3 च्या यशस्वी मोहिमेचा सुरेख असा उभेउभं देखावा तयार करत अनेकांचे लक्ष वेधले असून यात त्यांनी गौराईचे आगमन प्रत्यक्षात यानातून दाखवले असून यानाच्या वरती या मोहिमेत भारतीय अंतराळ संशोधन इस्रो (खडठज) या संस्थेने तसेच या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावणार्या शास्त्रज्ञानाच्या माहितीसह त्यांचे फोटो लावत त्याचा कार्याचा गौरव केला आहे तर प्रत्यक्षात चंद्रावर उतरलेल्या यानाची प्रतिकृती यातून त्यांनी दाखवली आहे त्यांच्या या आगळ्यावेगळ्या देखाव्याचे सर्वत्र कौतुक होत असून अनेकांनी देखावा पाहण्यासाठी त्यांच्या घरी भेटी दिल्या आहेत.त्याना या कामी त्यांचा कुटूंबाची बहुमूल्य साथ लाभली.
COMMENTS