Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निळवंडे कालव्यांच्या कामांसाठी चक्का जाम आंदोलन

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः नगर जिल्हातील निळवंडे धरणाच्या कालव्यांना गती मिळावी म्हणून माजी मंजी, आमदार प्राजक्त तनपुरेंसह लाभधारक शेतकर्‍यांनी न

दारू पिण्याचा दिलेला सल्ला अखेर डॉक्टरला भोवला ; शासनाने केले कार्यमुक्त
श्री नागेश विद्यालयाचे नाव झळकले इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये
Ahmednagar :नगरमधील मंदिरे खुली करण्यासाठी भाजप कार्यकर्ते आक्रमक | LOK News24

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः नगर जिल्हातील निळवंडे धरणाच्या कालव्यांना गती मिळावी म्हणून माजी मंजी, आमदार प्राजक्त तनपुरेंसह लाभधारक शेतकर्‍यांनी नगर मनमाड महामार्गावर चक्का जाम आंदोलन केले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात गती मिळालेले हे काम सध्या संथगतीने सुरू असल्याचा आरोप करत लवकरात लवकर हे काम सुरू झाले नाहीतर लाभधारक शेतकरी रस्त्यावर बसतील, असा इशारा यावेळी आ. तनपुरेंनी सरकारला दिला आहे.
            निळवंडे कालव्याच्या कामाला गती मिळावी यासाठी आ. प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली निळवंडे कालवा कृती समिती, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरेंसह 21 गावातील लाभधारक शेतकर्‍यांनी गुहा गावानजीक नगर-मनमाड महामार्ग आडवत हे रास्ता रोको आंदोलन केले. निळवंडे उजव्या कालव्याचे कामे त्वरीत पूर्ण करावीत, तांदुळनेर येथील वन विभागाच्या हद्दीतील कामे त्वरीत सुरू करावीत, कणगर वडाचे लवण येथे सुरू असलेल्या कामाला गती मिळावी, पाटचार्‍यांची कामे तात्काळ सुरू करावी, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या आहे.आंदोलनात सुजित वाबळे, रवींद्र आढाव, सुरेश निमसे, रमेश कोबरणे, विजू हारदे, नाना कोबरणे, अशोक उरहे, रामा बर्डे, वेणूनाथ लांबे, निलेश ओहळ, प्रणय कोळसे आदींसह परिसरातील लाभधारक शेतकरी सहभागी झाले होते.

मुळात या कालव्यांना पाणी येऊच नये असे काहींना वाटते कारण याचं पाण्यावर त्यांचे कारखाने चालले पाहीजे अशी त्यांची भुमिका आहे. सध्याचे सरकार हे गेंड्याच्या कातड्याचे सरकार असून शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर बेफिकीर आहे. यापुढे रास्ता रोको, उपोषणे करून चालणार नाही तर, सरकारला वठणीवर आणण्यासाठी सर्वजन एकत्र येऊन एक व्यापक आंदोलन उभारू.
रवी मोरे, स्वाभिमानी जिल्हाध्यक्ष.

COMMENTS