Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर येथे चैत्र यात्रेस प्रारंभ

फलटण / प्रतिनिधी : दक्षिण भारताचे कैलास म्हणून ओळखल्या जाणार्‍या श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर येथील चैत्र यात्रा मोठ्या उत्साहात साजरी होत असून शि

दिल्ली विमानतळावर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी l DAINIK LOKMNTHAN
धनंजय महाडिक यांची राज्यसभेवर निवड; राष्ट्रवादी कार्यकर्ते महाडीक यांच्या संपर्कात
खाद्य पदार्थ पॅकींगसाठी वृत्तपत्राचा वापर टाळण्याचे आवाहन

फलटण / प्रतिनिधी : दक्षिण भारताचे कैलास म्हणून ओळखल्या जाणार्‍या श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर येथील चैत्र यात्रा मोठ्या उत्साहात साजरी होत असून शिखर शिंगणापूरच्या मोठ्या महादेवाला परंपरागत पध्दतीने जलाभिषेक घालण्यासाठी राज्यभरातून अनेक मानाच्या कावडी आज येथून शिखर शिंगणापूरकडे रवाना झाल्या. त्यावेळी फलटणच्या भाविकांतर्फे या कावडींचे यथोचित स्वागत करण्यात आले.
गेल्या दोन वर्षापासून कोरोणाच्या पार्श्‍वभूमीवरती असणार्‍या निर्बंधांमुळे ही कावड यात्रा बंद ठेवण्यात आली होती. मात्र, आता सर्वत्र कोरोनाची रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणावरती घटली आहे. या विषाणूची तीव्रताही कमी झाली आहे तरी या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने या वर्षी श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर शंभू महादेव यात्रेला व कावड सोहळ्याला परवानगी द्यावी, अशी मागणी येथील भाविकांनी ठरावाच्या माध्यमातून करण्यात आली होती. यानंतर कोरोनाचे निर्बंध पाळत यात्रेला परवानगी देण्यात आली होती. तसेच नुकतेच राज्य सरकारने कोरोनाचे सर्व नियम निर्बंधामुक्त केल्याने यावर्षी चैत्र यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात होत आहे.
शिखर शिंगणापूरची यात्रा 12 दिवस चालते. यात्रेची सुरुवात गुढीपाडव्यापासून म्हणजेच चैत्र शुध्द प्रतिपदेला होते. शुभशकुनाची गुढी उभारून श्री क्षेत्र शिखर शिंगणापूरच्या यात्रेस प्रारंभ होतो. पंचमीला शंभू महादेवाला आणि पार्वतीमातेला हळद लावली जाते. अष्टमीला रात्री 12 वाजता देवाचे लग्न लावले जाते. एकादशीच्या दिवशी इंदूरच्या राजघराण्यातील युवराज किंवा राजा शिखर शिंगणापूरला येतो आणि देवस्थानातर्फे राजाचा सत्कार समारंभ केला जातो.
या यात्रेनिमित्त फलटण येथून शिखर शिंगणापूरकडे जाणार्‍या या सर्व मानाच्या कावडी आपापल्या नियोजनाप्रमाणे परंपरागत मार्गाने शंभू महादेवाच्या पायथ्याशी मुंगीघाटाकडे मार्गस्थ झाल्या. तत्पूर्वी फलटणमधील भाविकांनी या कावडींचे व त्यासोबत असणार्‍या मानकर्‍यांंचे स्वागत करुन दर्शन घेतले. कावडी सोबत असणारी परंपरागत डफडी, शिंग, तुतार्‍या आणि हरहर महादेवाच्या जयघोषाने सारा परिसर दणाणून गेला होता. सासवड, जि. पुणे येथील भुतोजीबुवा तेली या कावडीचे व त्यासोबत असणार्‍या मानकर्‍यांचे व कावडीचे स्वागत व पूजन झाले. गुणवरे, ता. फलटण येथील आढाव कुटुंबाच्या कावडीला वाटाड्याचा मान असून सर्वात पुढे असलेल्या या कावडीमागून उर्वरित कावडी मानानुक्रमे जातात तर तेल्या भुत्याच्या कावडीचा मान शेवटी असतो.
त्यावेळी प्रचंड उन्हाचा तडाखा आणि मुंगी घाटाची उभी चढन या कावडी व त्यांचे मानकरी आणि भक्त सहजपणे चढून जाताना पाहण्यासाठी राज्याच्या विविध भागातून आलेेले भाविक मोठ्या संख्येने घाटाच्या पायथ्याशी आणि पठारावर उपस्थित असतात. शंभू महादेवाला अभिषेक करण्यासाठी खालून कावडीत पाणी आणतात. विशिष्ठ प्रकारची वाद्ये आणि हर हर महादेवाचा जयघोषच मुंगी घाटातून कावडी वर नेण्याची प्रेरणा व शक्ती असल्याने त्याच्या निनादात आणि शंभू महादेवाच्या जयघोषात कावडी वर नेण्यात येतात. या कावडींमध्ये सगळ्यात मोठी व मानाची कावड असते ती तेल्या भुत्याची.
या कावडीला दोन मोठेे रांजण लावलेले असतात. मोठ्या कष्टाने कावड वर नेली जाते. रात्री 12 वाजता सप्त नद्या आणि शिंगणापूर परिसरातील पुष्कर तलावातील पाण्याने शंभू महादेवाला जलाभिषेक घातला जातो. मुंगी घाटातून या सर्व कावडी सायंकाळपर्यंत शिखर शिंगणापूर डोंगर पठारावर पोहोचतील आणि तेथून मानानुक्रमे शंभू महादेवाला जलाभिषेक करुन परततील.
12-5

COMMENTS