छ.संभाजीनगर/प्रतिनिधी ः जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील आंतरवाली सराटी गावामध्ये मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याचे पडसाद संपूर
छ.संभाजीनगर/प्रतिनिधी ः जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील आंतरवाली सराटी गावामध्ये मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत असून, याप्रकरणी सकल मराठा समाजाने आज सोमवारी छत्रपती संभाजीनगर शहर बंदची हाक दिली आहे.
राज्यभर सकरारविरोधात रस्त्यावर उतरून रोष व्यक्त करण्यात येत आहे. मंत्र्यांबरोबरच विरोधी पक्षातील आमदार, खासदारांवरही राग व्यक्त करत आंदोलकांनी सरकारची तिरडी काढली. काहींनी जिवंतपणे आरक्षण न देणार्या आमदार, खासदार आणि राजकीय पुढार्यांना श्रद्धांजली वाहत आपला संताप व्यक्त केला. शहरात 20 ठिकाणी आंदोलने, पाच ठिकाणी ‘रास्ता रोको’ झाले. सुमारे 2,200 पोलिस अधिकारी-कर्मचारी बंदोबस्तासाठी होते. लाठीमाराचा आदेश देणार्या पोलिस अधिकार्याला निलंबित करा, याची जबाबदारी घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा द्यावा, अशा मागण्या आंदोलकांनी केल्या. ‘आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे’, ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या. उद्धव ठाकरे गटासह अनेक राजकीय पक्षांनी विभागीय आयुक्तांना निवेदन दिले. काँग्रेसने जनसंवाद यात्रा रद्द केली. दिवसभरात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे, उदयनराजे भोसले, संभाजीराजे भोसले हेदेखील शहरात येऊन पुढे आंतरवाली येथे गेले. शहरात प्रत्येक चौकात, शहराच्या एंट्री पॉइंटला पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे.
COMMENTS