Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सीईओ आयुष प्रसाद अपघातातून थोडक्यात बचावले

पुणे ः पुणे-नाशिक महामार्गावर झालेल्या एका भीषण अपघातात पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद हे बचावले. आंबेगाव तालुक्यातील ए

अल्पवयीन मुलीवर जिम चालक तरूणाचा अत्याचार
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मध्ये नव्या टप्पूची एंट्री होणार
सिने कलाकार ज्युनियर मेहमूद यांचे निधन

पुणे ः पुणे-नाशिक महामार्गावर झालेल्या एका भीषण अपघातात पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद हे बचावले. आंबेगाव तालुक्यातील एकलहरे येथे प्रसाद यांच्या वाहनास अपघात झाला. या अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी-पुण्यावरून जुन्नर येथे केंद्रीय सचिव दौर्‍यासाठी आयुष प्रसाद हे त्यांच्या वाहनातून जात असताना पुणे-नाशिक महामार्गावरील आंबेगाव तालुक्यातील एकलहरे येथे एका मालवाहतुक करणा-या वाहनाने धडक दिली. या धडकेत प्रसाद यांच्या कारचे दोन्ही टायर फुटले. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद या अपघातातून वाचले. सुदैवाने त्यांच्यासोबत असलेले अंगरकक्षही या अपघातातून बचावले आहेत.

COMMENTS