Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मध्य रेल्वेच्या ढिसाळपणा आणि प्रवाशांचा संताप

रोजच्या 70 फेर्‍या रद्द, शेकडो लोकल विलंबाने

मुंबई : मध्य रेल्वेचा खोळंबा प्रवाशांना सवयीचा झाला आहे. मध्य रेल्वेवर रोज सरासरी 70 लोकलफेर्‍या रद्द होतात तर 100पेक्षा जास्त लोकलफेर्‍या विलंबा

अरे बापरे…जिल्ह्यात एकाच दिवसात 224 मृत्यू ;मृत्यू तांडवाने नगर जिल्ह्यात खळबळ, आकडे चुकल्याचा संशय
मित्रासोबत फिरायला गेलेल्या 25 वर्षीय तरुणीवर गँगरेप | पहा ‘सुपरफास्ट महाराष्ट्र’ | Lok News24
पुण्यात कुख्यात गुंडाची दगडाचे ठेचून हत्या

मुंबई : मध्य रेल्वेचा खोळंबा प्रवाशांना सवयीचा झाला आहे. मध्य रेल्वेवर रोज सरासरी 70 लोकलफेर्‍या रद्द होतात तर 100पेक्षा जास्त लोकलफेर्‍या विलंबाने धावतात. रोज ‘मरे’ त्याला कोण रडे, असे म्हणून प्रवासी हतबलतेने हा त्रास सहन करत असताना रेल्वे प्रशासन मात्र या विलंबाला प्रवासी जबाबदार असल्याचे सांगत आहे. मध्य रेल्वेवर 1,810 लोकल फेर्‍या आहेत. मात्र ही आकडेवारी कागदोपत्री असून यातील 70पेक्षा जास्त लोकल फेर्‍या दररोज रद्द होत असल्याची माहिती समोर आली आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये 2 हजारपेक्षा जास्त लोकल रद्द तर 3 हजारांहून अधिक लोकल फेर्‍या उशिराने धावल्या. एक हजारांपेक्षा जास्त फेर्‍या ब्लॉकमुळे तर उर्वरित फेर्‍या तांत्रिक बिघाड, खराब हवेमुळे रद्द झाल्या. रविवारी आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी 370 फेर्‍या रद्दच असतात.

COMMENTS