मुंबई ः मध्य रेल्वेचे वाहतूक पुन्हा विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांना मात्र मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. कसारा मार्गाहून जाणार्या मालगाडीचे इंज

मुंबई ः मध्य रेल्वेचे वाहतूक पुन्हा विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांना मात्र मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. कसारा मार्गाहून जाणार्या मालगाडीचे इंजिन उंबरमाळी थांब्यादरम्यान फेल झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी संध्याकाळी साडेचार वाजेदरम्यान ही घटना घडली आहे. यामुळे आसनगाव-कसारा मार्गावर जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कसारा मार्गाहून जाणार्या मालगाडीचे इंजिन उंबरमाळीजवळ फेल झाल्याची घटना घडली आहे. मालगाडीचे इंजिन बंद झाल्यामुळे डाऊन मार्ग ठप्प झाला आहे. इंजिन बंद पडल्यामुळे आसनगाव, कसारा मार्गावर जाणारी लोकल वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे आसनगाव-कसार्याकडे जाणार्या प्रवाशांचे हाल झाले आहे. कसारा आणि खर्डीदरम्यान उंबरमाळीजवळ मालगाडीचे इंजिन फेल झाल्याने कसार्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे कसारा लोकल आसनगाव स्टेशनवर रद्द केल्याने कसार्याकडे जाणार्या प्रवाशांचे हाल झाले आहे. तर कसारा लोकल ही आसनगावहून पुन्हा सीएसएमटीकडे रवाना करण्यात आली आहे. दरम्यान, कसार्याहून इंजिन आले असून 15 मिनिटात मालगाडी इंजिन टोचन करून कसार्याकडे रवाना करण्यात येणार आहे. उंबरमाळी रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचे इंजिन बंद पडल्यामुळे रेल्वे ट्रॅकवर वाहतूक कोंडी झाली.
COMMENTS