Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निळवंडे येथे केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धा उत्साहात

संगमनेर/प्रतिनिधी - शिक्षण विभाग पंचायत समिती संगमनेर अंतर्गत वडगाव पान केंद्रातील विद्यार्थ्यांच्या केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धा जिल्हा

हरिभाऊ धाडगे व अशोक कराळे यांची मोटारसायकलवर चारीधाम यात्रा
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या डागडुजीवर कोट्यावधींची लूट
कोपरगावचे गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील -आ.आशुतोष काळे

संगमनेर/प्रतिनिधी – शिक्षण विभाग पंचायत समिती संगमनेर अंतर्गत वडगाव पान केंद्रातील विद्यार्थ्यांच्या केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निळवंडे येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. शाळा स्तरावरील प्रथम क्रमांक विजेत्या स्पर्धकांनी या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. केंद्रप्रमुख अलका साखरे यांच्या हस्ते या स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक ज्ञानदेव फड, शिवाजी नागरे, एकनाथ साबळे, केंद्र समन्वयक सुनील झावरे आदिसह केंद्रातील मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.


स्पर्धेतील प्रथम क्रमांक आलेला स्पर्धक बीटस्तरीय स्पर्धेस पात्र झाले आहेत. प्रथम क्रमांकाचे स्पर्धेतील विद्यार्थी व स्पर्धा पुढील प्रमाणे-हस्ताक्षर स्पर्धा-किलबिल गट-शरयू गवांदे, पोखरी हवेली, बालगट-साईनाथ पवार, कानिफनाथ वस्ती, कुमार गट-वक्तृत्व स्पर्धा- किलबिल गट-अमृता उकिर्डे, निळवंडे, बालगट-उन्नती कोल्हे, महादेव मळा, किशोर गट-समीक्षा खंडिझोड, मनोली, कुमार गट-  स्वामिनी शिंदे, मनोली, गोष्ट कथा सादरीकरण-बालगट-स्वराली काशीद, वडगाव पान,किशोर गट-सायली शेरमाळे, समनापूर मराठी, कुमार गट-अमित पवार, निळवंडे, वेशभूषेनुसार सादरीकरण स्पर्धा-किलबिल गट-आयुष कडलग, पोखरी हवेली, बालगट-अथर्व चव्हाण, वडगाव पान, किशोर गट-कल्याणी पवार, निळवंडे, कुमार गट-श्रेया उकिर्डे, निळवंडे, वैयक्तिक गीत गायन-किलबिल गट-आरुष दये, पोखरी हवेली, बालगट-सान्वी पवार, कोकणगाव, किशोर गट-ओम सूर्यवंशी, मनोली, कुमार गट-गौरी सूर्यवंशी, मनोली, समूहगीत गायन स्पर्धा-लहान गट-सूरसंगम तालसंगम, कोकणगाव मोठा गट-विविधतेतून एकता, मनोली, सांस्कृतिक कार्यक्रम-लहान गट -कोकणगाव,मोठा गट-मनोली. याप्रसंगी सर्व स्पर्धकांना मिष्टान्न भोजन देण्यात आले. केंद्रस्तरीय स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी गटशिक्षणाधिकारी सुवर्णा फटांगरे, केंद्रप्रमुख अलका साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक गटासाठी नियुक्त केलेले परीक्षक, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, निळवंडे शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानदेव फड, पदवीधर शिक्षक बाळासाहेब जाधव, सौदामिनी सोनवणे, कैलास दिघे,अण्णासाहेब मरभळ, सोमनाथ गंभीरे, सोमनाथ गडगे, मंदा गायकर, अनिल कडलग आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ गडगे व बाळासाहेब जाधव यांनी केले.

COMMENTS