Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महागाई रोखण्यात केंद्र सरकार अपयशी ः आ. तनपुरे

राहुरी/प्रतिनिधी ः केंद्र सरकार महागाई, बेरोजगारीच्या प्रश्‍नावर फोल ठरले आहे. चारशेचा गॅस सिलेंडर बाराशे रुपयांवर पोचला आहे. बेरोजगारीने उच्चांक

भाचेबा तुमच्या मतदारसंघाप्रमाणे मामाच्या मतदारसंघाकडे लक्ष द्या : जयंत पाटील यांची भाचे तनपुरेंकडे मागणी
पंचनामे करून घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही ः आ. प्राजक्त तनपुरे
’शासन आपल्या दारी’ विद्यार्थी करतात ’शाळेची पायी वारी’

राहुरी/प्रतिनिधी ः केंद्र सरकार महागाई, बेरोजगारीच्या प्रश्‍नावर फोल ठरले आहे. चारशेचा गॅस सिलेंडर बाराशे रुपयांवर पोचला आहे. बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे. आगामी सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भाजपाला कोणतेही मुद्दे नाहीत. धार्मिक तेढ निर्माण करुन भावनिक मुद्द्यावर निवडणुकीला सामोरे जाण्याचा फंडा राहील. त्यांच्यापासून जनतेने सावध राहावे. त्यांना थारा देऊ नये. असे माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.
राहुरी खुर्द येथे (रविवारी) मुळा पाटबंधारे वसाहतीतील रस्त्यांच्या कामाचा शुभारंभप्रसंगी आमदार तनपुरे बोलत होते. अध्यक्षस्थानी पंढरीनाथ तोडमल होते. मुळा पाटबंधारेचे उपविभागीय अधिकारी शरद कांबळे, सरपंच मालती साखरे, उपसरपंच तुकाराम बाचकर, ग्रामपंचायत सदस्य राम तोडमल, पोपट चोपडे, मंगल शेडगे, असफ पठाण, इमाम शेख, सुरेश निमसे, मधुकर पवार, आयुब पठाण, भास्कर तोडमल, प्रदीप पवार, अण्णासाहेब बाचकर, गंगाधर तमनर, गेणुभाऊ तोडमल, दीपक शेडगे, विजय तमनर, पुंजा आघाव उपस्थित होते. आमदार तनपुरे म्हणाले, राज्यात एक वर्षापासून मंत्रीमंडळाचा विस्तार रखडला. चार-पाच खाते एकेका मंत्र्याकडे असल्याने त्यांचा कामाचा भार वाढला आहे. त्यामुळे, जनतेची कामे रेंगाळली आहेत. खोके सरकार पळून गेलेल्या 40 आमदारांना सांभाळण्यात व्यस्त आहे. त्यांना जनतेच्या समस्यांशी स्वारस्य नाही. वीजेचे प्रश्‍न वाढले आहेत. रोहित्र जळाले. तर ऑइल नसल्याने रोहित्र दुरुस्तीची कामे होत नाहीत. मागील वर्षीच्या अतिवृष्टी, सततच्या पावसाने नुकसानग्रस्त शेतकरी एक वर्षापासून आर्थिक मदतीची वाट पाहत आहेत. शेतकर्‍यांची दिवसा वीजेची मागणी आहे. त्यासाठी, महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू केलेले आरडगाव येथील मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पाचे काम रखडले आहे. खिळखिळ्या झालेल्या कालबाह्य एसटीवर गतिमान शासन अशी जाहिरातबाजी करून शासन गतिमान होत नाही. असा टोला आमदार तनपुरे यांनी लगावला.

COMMENTS