कोपरगाव तालुका ः सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन तथा संजीवनी युवा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांच्

कोपरगाव तालुका ः सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन तथा संजीवनी युवा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहास विद्यार्थ्यांना खाटांचे विवेक कोल्हे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
सहकार महर्षी स्व.शंकरराव कोल्हे यांच्या विचारांचा वारसा घेऊन समाजसेवा हाच धर्म या मुलमंत्राचा जोपासना कोल्हे परिवार समाज सेवा करीत आहे, या तत्वाची जोपासना करणार्या विवेक कोल्हे यांना वाढदिवसाचे औचित्य साधत विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. त्यामध्ये संजीवनी युवा प्रतिष्ठाणच्या वतीने काल शिर्डी येथे फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून द्वारकामाई वृद्धाश्रमात वृद्ध महिला व पुरुषांची मधुमेह, रक्त दाबाची तपासणी करण्यात आली. तर वृद्धांना मोफत गोळ्या औषधांचे वाटप करण्यात आले. याकामी डॉ. सुजित सोनवणे, भूषण जावळे यांचे सहकार्य लाभले. तर संजीवनी कॉल सेंटर येथे रक्तदान शिबीर आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सुमारे शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान करीत विवेक कोल्हे यांना सामाजिक कार्याच्या शुभेच्छा व्यक्त केल्या. तसेच गांधीनगर भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील विद्यार्थ्यांना मोफत खाटांचे वाटप करण्यात आले.या प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाच्या प्रारंगणात आयोजित सत्कार समारंभादरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्षाताई रुपवते, डॉ. चेतन लोखंडे, पराग संधान, दत्ता काले, रवींद्र पाठक, राजेंद्र सोनवणे, विनोद राक्षे, भीमा संवत्सरकर, जनार्दन कदम, सिद्धार्थ साठे, सोमनाथ म्हस्के, रवींद्र रोहमारे, गोपिनाथ गायकवाड, शरद खरात, प्रशांत कडू, राजेंद्र बागुल, सतीश रानोडे, जयप्रकाश आव्हाड, अहमदभाई बेकरीवाले, वैभव गिरमे, अनिल गायकवाड, शफिक सय्यद, विष्णुपंत गायकवाड, नारायण गवळी, विजय चव्हाणके, सलीम पठाण, लियाकत सय्यद, भानुदास पवार, रमेश भोपे, दादासाहेब नाईकवाडे, रामचंद्र साळुंके, डॉ.अनिल जाधव, मुख्तार पठाण, अमोल राजूरकर, शरद त्रिभुवन, हुसेन सय्यद, राजेंद्र गंगोले, रुपेश सिनगर, रवींद्र लचुरे, रोहित कनगरे, विक्की मंजुळ, इलियास खाटीक, सिद्धू भाटिया, अण्णा नरोडे, सागर कोपरे, शुभम गवारे, सचिन सावंत, सुशांत घोडके, गोरख देवडे, मुन्ना दपरेल, सुजल चंदनशिव, आढाव, विक्रांत सोनवणे, शरद खरात, मयूर जोभनपुत्र, सोमेश कायस्थ, नरेंद्र लकारे, आनंद जगताप, आयाज शेख आदींसह युवा कार्यकर्ते उपस्थित होते.
COMMENTS