Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईत ‘गद्दार दिन’ साजरा करण्यास मनाई

पोलिसांकडून ठाकरे गटाच्या नेत्यांना नोटीसा

मुंबई/प्रतिनिधी : राज्यात शिंदे गट आणि ठाकरे गटाकडूनही शिवसेनेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र शिवसेनेच्या वर्धापनदिनानंतर दुसर्‍

देवाचीच केली लबाड भक्ताने फसवणूक
हिम्मत असेल तर बुलढाण्यातून माझ्या विरोधात लोकसभा निवडून दाखवा
सकाळीच कोणीतरी कोणतीही झंजट मागे लावील…; इंदोरीकर महाराजांनी व्यक्त केला उद्वेग

मुंबई/प्रतिनिधी : राज्यात शिंदे गट आणि ठाकरे गटाकडूनही शिवसेनेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र शिवसेनेच्या वर्धापनदिनानंतर दुसर्‍या दिवशी ठाकरे गटाकडून गद्दार दिन साजरा करण्याचे नियोजन केले जात आहे. शिंदे-फडणवीस सरकारचा निषेध करण्यासाठी मविआचे नेते आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे. परंतु आता गद्दार दिन साजरा करण्यावर आज मुंबई पोलिसांकडून प्रतिबंध घालण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई पोलिसांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना पोलिसांनी नोटीसा जारी करत गद्दार दिन साजरा करण्यास प्रतिबंध घातला आहे. त्यामुळे आता यावरून सत्ताधारी भाजप-शिंदे गट आणि मविआच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची शक्यता आहे. शिंदे-फडणवीस सरकारला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे, त्यानिमित्त महाविकास आघाडीकडून राज्यभरात गद्दार दिन साजरा करण्यात येणार आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील 40 आमदारांसह बंड करण्याला मंगळवारी वर्ष पूर्ण झाले आहे. त्याचा निषेध करण्यासाठी विरोधकांकडून गद्दार दिन साजरा केला जात आहे. ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून गद्दार दिनाच्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करण्यात येत आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी मुंबई पोलिसांकडून ठाकरे गटाच्या नेत्यांना नोटीसा पाठवण्यात आल्या आहे. याशिवाय गद्दार दिन साजरा करण्यावर प्रतिबंध करण्यात आला आहे. गद्दार दिन साजरा करणार्‍या नेत्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे मुंबई पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. महाविकास आघाडीकडून खोके दिन आणि गद्दार दिन साजरा करण्याचे आदेश राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले आहे. ठाकरे गटाच्या राज्यव्यापी शिबिरात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गद्दार असा उल्लेख केला होता, त्यानंतर मुंबईतील कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांनी देखील उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केल्याचा आरोप करत जोरदार प्रत्युत्तर दिले होते.  

COMMENTS