बुलढाणा : ओबीसी मुक्तीचा जाहीरनामा असलेला मंडल आयोग ७ ऑगस्ट १९९० रोजी लागू करण्याची घोषणा लोकसभेत करण्यात आली. या दिवसाला उजाळा देण्यासाठी समस्त
बुलढाणा : ओबीसी मुक्तीचा जाहीरनामा असलेला मंडल आयोग ७ ऑगस्ट १९९० रोजी लागू करण्याची घोषणा लोकसभेत करण्यात आली. या दिवसाला उजाळा देण्यासाठी समस्त ओबीसी समाजबांधवांनी राज्यभरात मंडल दिन उत्साहात साजरा करावा, असे आवाहन ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाचे संस्थापक अध्यक्ष सुनील शेळके यांनी केले.
ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाच्यावतीने राज्य कार्यकारिणीच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. बैठकीला संघटनेचे मार्गदर्शक डॉ. शिवशंकर गोरे, मुंबई विभागीय अध्यक्ष महादेव मिरगे, नागपूर विभागीय अध्यक्ष निवृत्ती तांगडे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलतांना सुनील शेळके म्हणाले, ७ ऑगस्ट मंडल दिनाला उजाळा देत राज्यातील प्रत्येक जिल्हा पदाधिकारी यांनी शासकीय व निमशासकीय सेवेत निवड झालेल्या उमेदवारांचे व विविध परीक्षेत उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा सत्कार करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
धुळे जिल्हाध्यक्ष प्रभाकर चौधरी यांचे नुकतेच अपघाती निधन झाल्याने या आढावा बैठकीमध्ये त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी बुलढाणा जिल्हाध्यक्ष किशोर पवार, वाशीम जिल्हाध्यक्ष संभाजी साळसुंदर, धुळे जिल्हा उपाध्यक्ष खुशाल चित्ते, जालना जिल्हाध्यक्ष सुधाकर चिंधोटे, भंडारा जिल्हा प्रभारी दामोदर दहले, नाशिक जिल्हाप्रभारी नंदकिशोर पांचपुते, नंदुरबार जिल्हाप्रभारी रवींद्र देवरे, राज्य महासचिव राम वाडीभष्मे, संजय खांडवे, विठ्ठल इंगळे, मुरलीधर टेकाळे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS