Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शाळा कॉलेजच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे

मनसे सैनिकांची शिक्षणाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

राहाता ः शाळा कॉलेज परिसरातील मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक करावे अशी मागणी मनसे सैनिकांनी शिक्षण अधिकारी तसेच शहरातील सर्व

 आजी खेळाडूचे पालकत्व स्वीकारण्याचा एक नवीन पायंडा ः प्राचार्य चौरे
रुईगव्हाणच्या सरपंचपदी इंदिरा निलेश पवार बिनविरोध
छत्रपती शिवाजी महाराज सकारात्मक विचारांचे विद्यापीठ – स्वाती कोयटे

राहाता ः शाळा कॉलेज परिसरातील मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक करावे अशी मागणी मनसे सैनिकांनी शिक्षण अधिकारी तसेच शहरातील सर्व शाळा कॉलेजेस यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे.महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. सुरक्षा-2024/प्र.क्र.243/ विषयास अनुसरून अनुदानित व विनअनुदानित शाळा व माध्यमिक व ज्युनिअर कॉलेज व्यवस्थापनाच्या सर्व शाळांकरिता व शासन निर्णयाच्या दि 17 सप्टेंबर 2024 पासून एक महिन्याच्या आतमध्ये शाळा व महाविद्यालय व ज्यूनिअर कॉलेज ठिकाणी पर्याप्त संख्येने सीसीटीव्ही बसवणे बंधनकारक केले आहे. या तरतुदीचे पालन न करणार्‍या शाळांच्या संदर्भात योग्य ती कारवाई करण्यात यावी. तसेच शाळा व परिसरात केवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसून पुरेसे नसून ठराविक अंतराने त्या फुटेज तपासणी करणे देखील आवश्यक आहे. काही आक्षेपार्ह आढळून आल्यास त्यावर कार्यवाही करण्याची जबाबदारी विशेषता गटशिक्षण अधिकारी, म्हणून सर्वस्व शासनाची असेल गटशिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी,केंद्र प्रमुख आठवड्यातून तपासणी करणे आवश्यक आहे. शाळेतील शिक्षकाची नियुक्ती करताना काळजी घेणे नियमित कर्मचार्‍यांबरोबर बाह्य स्तोत्राद्वारे अथवा कंत्राटी पद्धतीने घेण्यात येणारे कर्मचार्‍यांवर काही गुन्हे आहे की नाही याची पूर्ण खात्री करूनच कामाला घ्यावे. बदलापूर सारख्या घटना होऊ नये यासाठी शासनाने केलेल्या नियमांची अंमलबजावणी सर्व खाजगी व्यवस्थानाच्या सर्व शाळा करिता व शासन निर्णयाचे पालन करावे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना व राहाता तालुक्यातील सर्व अनुदानित व विनाअनुदानितच्या शाळांना भेट देऊन पाहणी करणार आहे, त्रुटी आढळल्यास महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना संबंधित शाळेच्या मुख्याध्यपकांना कळवण्यात येईल व बदल न झाल्यास कारवाई करण्याची जबाबदारी शिक्षण व्यवस्थापनाची असेल असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या पत्रकांवर तालुका अध्यक्ष विद्यार्थी सेना विकास म्हस्के, राहता शहराध्यक्ष विजय मोगले, राहता विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष गणेश गाडेकर, अरुण भाई शेख आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

COMMENTS