Homeताज्या बातम्यादेश

सीबीएसई दहावी-बारावीच्या निकालात मुलींचाच डंका

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसइकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकालापाठोपाठ अवघ्या काही तासामध्ये दहावीचा निका

आरबीआयच्या पथकाकडून ’नगर अर्बन’बँकेमध्ये तपासणी | DAINIK LOKMNTHAN
धीरेंद्र शास्त्री विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार
Beed : परळी शहरातून तब्बल 140 गाढवं चोरीला (Video)

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसइकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकालापाठोपाठ अवघ्या काही तासामध्ये दहावीचा निकाल देखील जाहीर केला असून, यंदाच्या बारावी परीक्षेत एकूण 87.33 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून पुन्हा एकदा मुलींनी आघाडी घेतली आहे. त्रिवेंद्रम विभागाचा निकाल सर्वाधिक 99.91 टक्के लागला आहे. पुणे विभागाचा निकाल 87.28  टक्के लागला आहे.
यंदाची दहावीच्या निकालाची टक्केवारी 93.12 टक्के असून मागील वर्षीच्या तुलनेत निकाल 1.28 टक्क्यांनी घसरला आहे. मागील वर्षी दहावीचा निकाल 94.40 टक्के लागला होता. सीबीएसई बारावीच्या परीक्षसेसाठी 16,96,770 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यावर्षी 15 फेब्रुवारी ते 5 एप्रिल 2023 या कालावधीत परीक्षा घेण्यात आल्या होत्या. परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी मुलींनी 90.68 टक्के यश मिळवले, तर 84.67 टक्के मुले पास झाली आहेत.  विद्यार्थ्यांना डिजिलॉकरवरूनही आपला निकाल पाहता येणार आहे. सहा अंकी सिक्युरिटी पिनद्वारे डिजीलॉकरवरून त्यांचे मार्कशीट तथा प्रमाणपत्र आणि डोमिसाइल सर्टिफिकेट डाउनलोड करू शकतात. त्यासाठी सहा अंकी सुरक्षा पिन त्यांच्या शाळेतून मिळेल. या पिनच्या मदतीने विद्यार्थी डिजीलॉकर खात्यावर जाऊन त्यांच्या डिजिटल मार्कशीट आणि प्रमाणपत्रांसह विविध शैक्षणिक कागदपत्रे डाउनलोड करू शकतील. सीबीएसईने नोटीस जारी करून ही माहिती दिली.

दहावीचा 94.25 टक्के निकाल – दहावीच्या परीक्षा 14 फेब्रुवारी ते 21 मार्च दरम्यान झाल्या होत्या. या परीक्षेसाठी एकूण 21, 86, 485 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील 93.12 टक्के विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. बारावीप्रमाणेच दहावीच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली आहे. एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मुलींचे प्रमाण 94.25 टक्के असून मुलांचं प्रमाण 92.72 टक्के आहे.

COMMENTS