Homeताज्या बातम्यादेश

टोल नाक्यांवरील रोख व्यवहारांना पूर्णविराम

फास्टटॅग आणि यूपीआयद्वारेच होणार टोल पेमेंटनवी दिल्ली : राष्ट्रीय महामार्गांवरून प्रवास करणार्‍या वाहनचालकांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातम

पिंपरी -चिंचवड महापालिकेत महापौर आपलाच होणार… संजय राऊत
राज्यात बैलगाडी शर्यत सुरु होणारच : सुनील केदार
नुकसान भरपाईपोटी शेतकर्‍यांच्या खात्यात 44 कोटी रुपये

फास्टटॅग आणि यूपीआयद्वारेच होणार टोल पेमेंट
नवी दिल्ली : राष्ट्रीय महामार्गांवरून प्रवास करणार्‍या वाहनचालकांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारकडून टोल भरण्याच्या पद्धतीत मोठा बदल करण्याची तयारी अंतिम टप्प्यात असून, येत्या 1 एप्रिलपासून टोल नाक्यांवर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही, अशी माहिती समोर येत आहे. नव्या व्यवस्थेनुसार, टोल शुल्क भरण्यासाठी फास्टटॅग आणि यूपीआय हाच  एकमेव पर्याय उपलब्ध असेल.
या निर्णयामुळे टोल नाक्यांवर होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून, वाहनचालकांचा वेळ व इंधन दोन्ही वाचणार आहेत. रोख व्यवहारांमुळे होणार्‍या विलंबाला पूर्णविराम मिळणार असल्याचे सरकारचे मत आहे. टोल प्लाझा कॅशलेस करण्याचा निर्णय अचानक घेतलेला नसून, यासाठीची तयारी गेल्या काही काळापासून सुरू होती. अद्याप अधिकृत अधिसूचना जारी व्हायची असली, तरी नियम लागू करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. डिजिटल पेमेंटमुळे सुट्ट्या पैशांचा प्रश्‍न, रोख मोजणीचा वेळ आणि व्यवहारातील गैरप्रकार टाळता येणार आहेत. तसेच, प्रत्येक व्यवहाराची डिजिटल नोंद उपलब्ध राहणार असल्याने पारदर्शकतेतही वाढ होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे सचिव व्ही. उमाशंकर यांनी सांगितले की, भारताची डिजिटल अर्थव्यवस्था वेगाने विस्तारत आहे. याच पार्श्‍वभूमीवर यूपीआयद्वारे टोल भरण्याची सुविधा सुरू करण्यात आली होती, ज्याला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

COMMENTS