Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अल्पवयीन मुलीशी विवाह; नवरदेवासह पाच जणांविरोधात गुन्हा

पाथर्डी : अल्पवयीन मुलीशी विवाह केल्या प्रकरणी नवरदेवासह पाच जणांविरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालविवाह प्रतिबंधक अधि

नगरसेविका वंदना टेकेंच्या अपात्रतेची सुनावणी २० तारखेला
नवरात्रोत्सवात भाविकांना ई पास उपलब्ध करून देण्याचा अनोखा उपक्रम
जागतिक विकासासाठी गांधी विचारांची गरज – प्रा. डॉ. सलमान अली मिर्झा

पाथर्डी : अल्पवयीन मुलीशी विवाह केल्या प्रकरणी नवरदेवासह पाच जणांविरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालविवाह प्रतिबंधक अधिकारी गोपीचंद नवनाथ रोंढे यांनी फिर्याद दिली आहे.
तालुक्यातील एका गावातील 15 वर्षीय मुलीचा विवाह झाला असल्याची माहिती उडाण संस्थेस मिळाली होती. या विवाहाचे छायाचित्र या संस्थेच्या प्रतिनिधींनी रोंढे यांना दिल्या नंतर त्यांनी या प्रकरणाची खातरजमा करत संबंधितांचे जबाब नोंदवले. त्यानंतर त्यांनी या प्रकरणातील आरोपी संतोष महादेव राठोड, इंदुबाई महादेव राठोड, महादेव भिमाजी राठोड व मुलीच्या आई वडिलांविरोधात  बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.
या घटनेतील मुलीचे वय पंधरा आहे तर नवरदेवाचे वय 28 आहे. राठोड याने 25 जानेवारी रोजी विवाह केला होता. या प्रकरणातील मुलगी ही पाथर्डी शहरातील एका विद्यालयात शिक्षण घेत आहे.ती विद्यालयात आल्यानंतर तिच्या गळ्यात मंगळसूत्र व पायात जोडवे असल्याचे तिच्या मैत्रिणीच्या लक्षात आले. त्यांनी या घटनेची माहिती विद्यालयातील शिक्षकांना दिली. त्यांनी या मुलीला पोलीस ठाण्यात आणले. त्या नंतर या मुलीला जिल्हा बालकल्याण समिती समोरही हजर करण्यात आले होते. या वेळी तिने आपला साखरपुडा झाला असल्याचे सांगितले. मात्र त्यानंतर उडाण संस्थेच्या प्रतिनिधीने अल्पवयीन मुलीच्या विवाहाचे फोटो सादर केल्यानंतर रोंढे यांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक विलास जाधव हे करत आहेत.

COMMENTS