Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रूपाली ठोंबरे व समर्थकांविरोधात गुन्हा दाखल

मतमोजणी केंद्रात गोंधळ घातल्याचा आरोपपुणे : पुणे महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान मतदान केंद्रात गोंधळ घालून निवडणूक प्रक्रिया व शासकीय कामका

राष्ट्रवादीतील संदोपसुंदी !
राष्ट्रवादीत निर्णायक घडामोडींना वेग
कोपरगाव शहर राष्ट्रवादी कार्यकारणीत नव्यांना संधी : आ. काळे

मतमोजणी केंद्रात गोंधळ घातल्याचा आरोप
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान मतदान केंद्रात गोंधळ घालून निवडणूक प्रक्रिया व शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार रूपाली ठोंबरे यांच्यासह त्यांच्या काही समर्थकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 16 जानेवारी रोजी दुपारी सुमारे बारा वाजता टिळक रस्त्यावरील डी.ई.एस. न्यू इंग्लिश स्कूल येथे घडली.
या प्रकरणी कसबा-विश्रामबाग वाडा क्षेत्रीय कार्यालयातील उपअभियंता सुधीर पांडुरंग आलुरकर (वय 52, रा. पिंपळे गुरव) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीच्या आधारे रूपाली ठोंबरे यांच्यासह इतर काही उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मतमोजणी सुरू असताना ठोंबरे यांनी हरकत अर्जाची पोहोच देण्याची मागणी करत मतमोजणी केंद्रात लावलेल्या सुरक्षा जाळीवर चढून घोषणाबाजी व आरडाओरड केली. त्यांच्यासोबत उपस्थित इतर उमेदवार व प्रतिनिधींनीही गोंधळ घालून निवडणूक प्रक्रियेत व्यत्यय आणल्याचा आरोप आहे. सुरक्षेसाठी उभारलेल्या व्यवस्थेचा भंग झाल्याने काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजपने मोठे यश मिळवत स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. शहरात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात प्रमुख लढत पाहायला मिळाली. निकालानुसार भाजपने 119 जागांवर विजय मिळवत महापालिकेवर एकहाती सत्ता स्थापन केली. या निकालामुळे अजित पवार गटातील अनेक नेत्यांना पराभवाचा धक्का बसला असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी प्रवक्त्या रूपाली पाटील ठोंबरे यांनाही पराभव स्वीकारावा लागला आहे.

COMMENTS