Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कन्नड औट्रम घाटात 300 फुट दरीत कोसळली कार; 4 ठार, 7 जण गंभीर जखमी

कन्नड / प्रतिनिधी : सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील कन्नड औट्रम घाटात सोमवार, दि. 27 रोजी पावणे दोन वाजता अक्कलकोट येथून देवदर्शन करून परतणा

जामखेड-आष्टी रोडवरील भीषण अपघातात 5 जण ठार
समृद्धीवरील अपघातात दोन डॉक्टरासह 3 जणांचा मृत्यू
पोलिसांच्या गाडीने चौघांना चिरडले; एकाचा मृत्यू

कन्नड / प्रतिनिधी : सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील कन्नड औट्रम घाटात सोमवार, दि. 27 रोजी पावणे दोन वाजता अक्कलकोट येथून देवदर्शन करून परतणारी तवेरा कार तीनशे फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात चारजण ठार तर सातजण गंभीर जखमी झाले आहेत. मृत्यू व जखमी जानेवाडी, मालेगाव येथील रहिवासी आहेत.

बचाव पथकात राष्ट्रीय महामार्ग पोलीस, चाळीसगाव शहर, ग्रामीण पोलीस या तीन पथकांनी व स्थानिक प्रवाशांनी रात्री सव्वादोन वाजता मदतकार्यास सुरवात केली. सकाळी सात वाजेपर्यंत मदत कार्य चालले. त्यातच घाटातील मेणबत्ती पॉईंटवर दरड कोसळली.

मोठाले दगड, माती रस्त्यावर पडून रस्ता बंद झाला. त्यामुळे जखमींना रुग्णालयापर्यंत पोहचविण्यात अडथळे निर्माण झाले. हे दगड, माती हटविण्यासाठी या पथकाने शर्थ केली. अक्षरशः हातांनी व फावड्याने दगड माती हटविण्यात आले. पाऊस, धुके आणि अंधार यामुळे मदत कार्य जिकरीचे व आव्हानात्मक झाले.

तिनशे फुट खोल दरीतून चार मृत्यू देह व सात जखमींना दोरखंड लावून, मोबाईलच्या टॉर्चच्या उजेडात वर काढण्यात आले. अक्कलकोट येथून देवदर्शन करून तवेरा कारने मालेगाव येथे परतत असताना पाऊस, धुके असल्याने कारचाकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने व तुटलेल्या कठड्यामुळे कार दरीत कोसळली. घाटातील जय मल्हार पाँईंट, जुना लाकडी पुल येथे अपघात झाला.

मृतांमध्ये प्रकाश गुलाबराव शिर्के (वय 65) शिलाबाई प्रकाश शिर्के (वय 60) वैशाली धर्मेंद्र सूर्यवंशी (वय 35), पूर्वा गणेश देशमुख (वय 8) यांचा समावेश आहे. जखमींमध्ये अनुज धर्मेंद्र सूर्यवंशी (वय 20) जयेश धर्मेंद्र सूर्यवंशी (वय 17), सिध्देश पुरुषोत्तम पवार (वय 12), कृष्णा वासुदेव शिर्के (वय 4), रूपाली गणेश देशमुख (वय 30), पुष्पा पुरुषोत्तम पवार (वय 35) व वाहन चालक अभय पोपटराव जैन (वय 50) यांचा समावेश आहे.

दरम्यान, हा अपघात झाल्यानंतर जखमी अनुष धर्मेंद्र सूर्यवंशी हा तिनशे फूट दरीतून वर आला. त्याने येणार्‍या-जाणार्‍या प्रवाशांना मदतीसाठी याचना केली. काही प्रवाशांनी चाळीसगाव शहर व ग्रामीण पोलिसांचे संपर्क साधला. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग पोलीस पथक चाळीसगाव ग्रामीण व शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. ग्रामीण शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील, सपोनि रूपाली पाटील, वीरेंद्र शिसोदे, गणेश काळे, जितेंद्र माळी, ललित महाजन, ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि धरमसिंग सुंदरवडे, संदीप पाटील, नाना बडगुजर, युवराज नाईक, संदीप माने, मनोज पाटील, बाबा राजपूत, नितीन वाल्हे, वीरेंद्र राजपूत, राजेंद्र साळुंखे, शंकर जंजाळे, नंदू परदेशी, राहुल सोनवणे आदींसह राष्ट्रीय महामार्ग पोलीस, चाळीसगाव शहर ग्रामीण पोलीस ठाण्याचे मदत पथक तसेच स्थानिक प्रवाशांनी अपघातग्रस्तांना खोल दरीतून बाहेर काढण्यासाठी मदत केली. जखमींना चाळीसगाव येथे अ‍ॅम्बुलन्सद्वारे रुग्णालयात पोहचविण्यात आले.

न्यायालयाने सततच्या वाहतूक कोंडीमुळे औट्रम घाट जड वाहतुकीसाठी बंद केला आहे. त्यामुळे हा घाट सुनसान झाला आहे. पुर्वी या घाटातून मोठी वाहतूक असल्याने अपघात झाल्यानंतर तत्काळ माहिती मिळत होती. आता फक्त खाजगी प्रवाशी छोटी वाहने या रस्त्यावरून ये-जा करत असल्याने काही अनुचित घटना घडली तर कोणाच्या लक्षात येत नाही. तसेच कन्नड व चाळीसगाव नाक्यावरील पोलीस नाका बंद करण्यात आला आहे. या अपघाताची चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गासाठी कोट्यवधी रुपये खर्च झाला. परंतू औट्रम घाटातील भूयारी मार्ग तयार केला नाही, हे अतार्किक आहे. केंद्रीय सडक मंत्री नितीन गडकरी यांना या प्रश्‍नी चर्चा करण्यासाठी संपर्क साधला परंतू ते वेळ देत नाहीत. विद्यमान आ. उदयसिंग राजपूत, भाजपचे विधानसभा प्रमुख डॉ. संजय गव्हाणे यांना या प्रश्‍नाचे गांभीर्य नाही. दररोज घाटात अपघात होत आहे, या प्रश्‍नी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा माजी आ. नितीन पाटील यांनी दिला आहे.

COMMENTS