कराड / प्रतिनिधी ः महामार्गावरून गांजाची विक्री करणार्या दोन सख्ख्या भावांना येथील पोलिसांनी नाकाबंदी करून अटक केली. खोडशी (ता. कराड) येथे काल दुपार
कराड / प्रतिनिधी ः महामार्गावरून गांजाची विक्री करणार्या दोन सख्ख्या भावांना येथील पोलिसांनी नाकाबंदी करून अटक केली. खोडशी (ता. कराड) येथे काल दुपारी कारवाई झाली. त्यात 43 हजार 560 रूपयांचा 8 किलो 900 ग्रमचा गांजासह चारचाकी कारही जप्त केली आहे. एकनाथ सदाशिव चव्हाण (वय 37) व बापू सदाशिव चव्हाण (22, दोघे रा. बीड, जि, बीड) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. पोलिस उपाधीक्षक कार्यालय व शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई केली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बीड परिसरातून एका कारमधून गांजाची वाहतूक सुरू आहे. तो कराड परिसरात येणार आहे, अशी माहिती पोलीस उपाधीक्षक रणजीत पाटील यांना मिळाली. त्यांनी त्याच्या तपासासाठी पोलीस निरिक्षक बी. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार केले. शहर व पोलीस उपाक्षीक कार्यालय अशी दोन पथके तयार करून खोडशी परिसरात सापळा रचण्यात आला. महामार्गावरून पोलिसांनी अपेक्षीत असलेले त्याच क्रमांकाची कार येताच पोलीस निरिक्षक पाटील यांच्या पथकाने ती कार ताब्यात घेवून त्या कारची झडती घेतली. त्यावेळी त्या कारमध्ये गांजा आढळून आला. पोलीस निरिक्षक पाटील, फौजदार राजेंद्र पुजारी, हवालदार सागर बर्गे, प्रवीण पवार, दीपक कोळी यांच्या पथकाने त्या कारसहीत दोघांना ताब्यात घेतले. कारमध्ये सापडलेला गांजा 8 किलो 900 ग्रॅम इतका होता. त्याचा पंचनामा करून गांजाहीसहीत कारही पोलिसांनी जप्त केली आहे. त्या दोघांनाही अटक केली आहे.
COMMENTS