Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नारायण राणे यांची खासदारकी रद्द करा

ठाकरे गटाचे विनायक राऊत यांची थेट निवडणूक आयोगाला नोटीस

मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात लक्षवेधी ठरलेली कोकणतील निवडणूक आता आरोप प्रत्यारोपांमुळे पुन्हा चर्चेत आहे. येथील निवडणुकीत भाजप महायुतीचे

संगमनेरमध्ये मुस्लीमबांधव उतरले रस्त्यावर | LOKNews24
बिपीन रावतसह 14 जणांचा मृत्यू ; हेलिकॉप्टर कोसळून दुर्घटना | DAINIK LOKMNTHAN
जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र स्थळांवर बचत गटांची उत्पादने 

मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात लक्षवेधी ठरलेली कोकणतील निवडणूक आता आरोप प्रत्यारोपांमुळे पुन्हा चर्चेत आहे. येथील निवडणुकीत भाजप महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी विजय मिळवला. मात्र, नारायण राणेंची खासदारकी अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण तातू राणे यांनी भ्रष्ट मार्गांचा वापर करत लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. त्यामुळे नारायण राणे यांची निवड रद्द करावी व त्यांच्यावर 5 वर्ष निवडणूक लढविण्यापासून आणि मतदान करण्यापासून बंदी लादण्यात यावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाते नेते आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचे उमेदवार विनायक राऊत यांनी केली आहे. याबाबत, अ‍ॅड. असीम सरोदे, अ‍ॅड. किशोर वरक, अ‍ॅड. श्रीया आवले यांच्यामार्फत कायदेशीर नोटिसही विनायक राऊत यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेली आहे.  
निवडणूक प्रचार कालावधी 5 मे 2024 रोजी संपलेला असतांनाही भाजप कार्यकर्ते 6 मे रोजी देखील नारायण राणे यांचा प्रचार करीत होते, नारायण राणे समर्थक प्रचार संपलेला असतांनाही ई.व्ही.एम.मशीन दाखवून राणे साहेबांनाच मत द्या, असे सांगून मतदारांना पैसे देत असल्याचे व्हिडिओ सर्वत्र प्रसारित झाल्याचे या नोटिसमध्ये नमूद करण्यात आले आहे. नारायण राणे यांचे पुत्र आमदार नीतेश राणे यांनी जाहीर सभा घेऊन मतदारांना धमकावले, जर राणे साहेबांना मतदान केले नाही, त्यांना लीड मिळाली नाही तर आमच्याचकडेच निधी मागायला यायचं आहे. त्यामुळे तेव्हा लीड मिळाली नाही तर तुम्हाला निधी सुद्धा मिळणार नाही अशी धमकी 13 एप्रिल रोजी झालेल्या सभेत नितीश राणे यांनी दिली, त्याचाही उल्लेख या नोटिसमध्ये करण्यात आलेला आहे. निवडणूक आचार संहितेचा नारायण राणे, नितेश राणे आणि भाजप कार्यकर्त्यांनी भंग केलेला आहे. त्यामुळे लोकशाहीची फसवणूक करून निवडून आलेल्या नारायण राणे यांच्या विजयाची निवडणूक आयोगने चौकशी करावी, अशी विनंती विनायक राऊत यांनी या कायदेशीर नोटिसमधून केलेली आहे. 

COMMENTS