Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डेंग्यू आजार नियंत्रणासाठी उपाययोजनाचे आवाहन

बीड प्रतिनिधी -  सध्या बीड जिल्ह्यामध्ये अनियमित पावसामुळे नक्की असून त्यामध्ये डास उत्पत्ती होऊन डेंग्यू सारख्या जीवघेण्या आजाराचे प्रमाण वाढले

लातूरसारखे ऑटिजम सेंटर्स प्रत्येक जिल्ह्यात उभारणार : धनंजय मुंडे
सर्व शासकीय रुग्‍णालय आणि आरोग्‍य केंद्रात लसीकरणाच्‍या सुविधा मोफत : डॉ. ज्‍योती मांडगे
अंबरनाथ रेल्वे स्थानकात पाण्याचा ठणठणाट

बीड प्रतिनिधी –  सध्या बीड जिल्ह्यामध्ये अनियमित पावसामुळे नक्की असून त्यामध्ये डास उत्पत्ती होऊन डेंग्यू सारख्या जीवघेण्या आजाराचे प्रमाण वाढले आहे. डेंग्यूचा प्रसार हा डासांपासून होत असल्यामुळे डासाची उत्पत्ती रोखणे हाच त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय आहे. पाऊस कमी पडल्यामुळे जनतेमध्ये पाणी साठविण्याचे प्रमाण वाढले आहे. स्वच्छ साठवलेल्या पाण्यामध्ये डेंग्यूच्या एडिट नावाच्या डासाची उत्पत्ती होते आणि त्याच डासाच्या मादी पासून डेंग्यू व चिकुनगुन्या या आजाराचा प्रसार व फैलाव होतो. ताप आल्यास नागरिकांनी आपल्या जवळच्या आरोग्य संस्थेस संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ यांनी केले आहे.त्याचबरोबर डेंग्यू हा नोटीफेबल आजार असल्यामुळे खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांनी आपल्याकडे आलेल्या प्रत्येक डेंग्यू रुग्णाची माहिती शासकीय आरोग्य संस्थेस कळवावी असे सांगण्यात आले आहे.

डेंग्यूची लक्षणेः- डेंग्यूमध्ये ही तिव्र ताप,तिव्र डोकेदुखी, स्नायू दुखी, उलट्या होणे, भूक मंदावणे, जास्त ताहान लागणे, तोंडाला कोरड पडणे, डोळ्याच्या आतील बाजूस दुखणे व डोळे लाल होणे, तापामध्ये चढ-उतार, अंगावर पुरळ येणे, त्वचेखाली रक्तस्राव, रक्त मिश्रित लघवी किंवा काळसर शौचास होणे, पोट दुखने, नाकातून तोंडातून रक्त येणे अशी लक्षणे असल्यास त्वरित उपचार घेणे आवश्यक आहे. बीड जिल्ह्यात केलेल्या डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना:- धूर फवारणी माहे ऑगस्ट मध्ये दूर फवारणी झालेल्या गाव,वाडी, वस्ती, शहरी वार्डाची संख्या 38. डास आळी नाशक  कार्यवाही बीड जिल्ह्यातील एकूण शहरी व ग्रामीण 57, प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत 297, उपकेंद्र स्तरावरील कर्मचारी व आशा वर्कर यांच्यामार्फत  1275 गावांमध्ये धडक मोहिमेद्वारे माहे ऑगस्ट पर्यंत अबेटिंगचे दोन राउंड पूर्ण झाले असून तिसरा राऊंड चालू आहे. डेंग्यू आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यामध्ये डास आळी भक्षक गप्पी मासे सोडण्याची धडक मोहीम राबविण्यात येत आहे. तालुका न्याय सोडलेले गप्पी मासे पुढील प्रमाणे गेवराई तालुका 91 ठिकाणी, आष्टी तालुका 130 ठिकाणी, पाटोदा तालुका 115 ठिकाणी, शिरूर कासार 52 ठिकाणी, बीड ग्रामीण व बीड शहर 287 ठिकाणी, केज 27ठिकाणी, धारूर 37 ठिकाणी, माजलगाव 37 ठिकाणी, अंबाजोगाई 161 ठिकाणी, परळी 27 ठिकाणी आणि वडवणी 21 एकूण 1071 ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात आले आहेत. जिल्ह्यात हिवतापासाठी तपासलेल्या संशयित रुग्णांचे एकूण घेतलेले रक्त नमुने 2,49,023 दूषित रुग्ण 01  आहे.  डेग्यू व चिकुनगुन्यासाठी एकूण 474 रक्तजल नमुन्याचा अहवाल तपासणी केली असता डेंग्यू 12 चिकुनगुन्या  19 रुग्ण आढळून आले आहेत. मेंदुज्वरासाठी  एकूण घेतलेले रक्तजल नमुने 6 असून त्यापैकी 2   अदुषित आणि 4 रक्तजल नमुन्याचा अहवाल अद्याप अप्राप्त आहे.  जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीमध्ये दोन उद्रेक जाहीर केलेले असून संशयित डेंग्युचे 3 मृत्यू झालेले आहे.

आजार टाळण्यासाठी या उपाययोजना – कीटकजन्य आजार टाळण्यासाठी डासांची उत्पत्ती होऊच न देणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. यासाठी साचलेले पाणी वाहते करा, पाण्याचा निचरा होण्यासाठी शोषखड्ड्याचा वापर करावा, घरासहभोवतालची डास उत्पत्ती स्थाने नष्ट करा, गप्पी मासे पाळा, परिसर स्वच्छ ठेवा, साचलेल्या पाण्यावर रॉकेल किंवा खराब आईलचे थेंब टाका, सर्व पाण्याचे साठे झाकूण, बांधून ठेवा, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळा, निरोपयोगी विहिरीत व साचलेल्या पाण्यात डास आळी भक्षक गप्पी मासे सोडा, सायंकाळच्या वेळेस घराचे दारे, खिडक्या बंद ठेवा व  गोठ्यात पाला पाचोळ्याचा धूर करा, डुकरांना गावापासून दूर ठेवा. दररोज कीटकनाशक भारित मच्छरदाणीचा वापर करा, संडासच्या वेंटपाईपला जाळी अथवा कपडा बसवणे, नाल्या वाहत्या करणे.

प्रत्येकाच्या लोकसहभाग महत्त्वाचा आहे.– डेग्यू,चिकूनगुन्या,हिवताप,आजार होऊ नये यासाठी प्रत्येकाचा लोकसहभाग महत्वाचा आहे. लोकसहभागानेच डेंग्यू सारख्या आजारापासून आपण मुक्ती मिळवू शेकतो असे आवाहन जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा हिवताप अधिकारी यांनी केले आहे.
शनिवारी पाळा कोरडा दिवस

कीटकजन्य आजारा आजाराच्या नियंत्रणासाठी आठवड्यातून शनिवार हा एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. या दिवशी पाण्याची टाकी, रांजण, माठ, वॉटर कुलर, फ्रिजच्या मागील पाणी रिकामे करून स्वच्छ आज पुसून घ्यावे. छतावरील खड्डे, टायर, भंगार वस्तू, नारळाच्या करवंट्या, प्लास्टिक वस्तू, कुंड्या खालची पेट्रीडिश,बादल्या फ्रिजचे ट्रे, निरोपयोगी माठ, भांड्यात पाणी साचू देऊ नये, कुलर, फुलदाण्या, झाडांच्या कुंड्या, प्राण्यांचे पाणी पिण्याचे भांडे यातील पाणी बदलत राहावे. वापराच्या पाण्याची भांडी झाकून ठेवावी. अथवा भांड्याचे तोंड कापडाणे घट्ट बांधावे, पाण्याच्या टाकीत गप्पी मासे सोडावीत, मच्छर अगरबत्ती, मच्छरदाणीचा वापर, पूर्ण अंग झाकेल असे सैल कपडे वापरावेत, घराच्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा व  पाणी साचू देऊ नये.  गवतजन्य वनस्पतीचा नायनाट करावा. डास होऊ नये म्हणून डास आळीची पैदास रोखण्यात यावी. वरील उपाययोजना केली तर काही अंशी डेंग्यू आजारावर नियंत्रण मिळवता येईल.

COMMENTS