Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील कॅफे मालकाला अटक

आरोपीला एका दिवसांची पोलिस कोठडी; आरोपींची संख्या आठवर

संगमनेर/प्रतिनिधी ःशिक्षण घेणार्‍या अल्पवयीन मुलीशी मैत्री करत तिच्यावर वारंवार अत्याचार करणार्‍या दोघा आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी अत्याचा

चेतन पिपाडा बनले कमर्शियल पायलट
पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातील 7600 कोटींच्या प्रकल्पांची केली पायाभरणी
वाहनचोरी करणार्‍या चोरांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

संगमनेर/प्रतिनिधी ःशिक्षण घेणार्‍या अल्पवयीन मुलीशी मैत्री करत तिच्यावर वारंवार अत्याचार करणार्‍या दोघा आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी अत्याचारासाठी आरोपींना मदत केल्याच्या कारणावरून सहा जणांना सहआरोपी केले आहे. यातील कॅफे मालकाला मंगळवारी पोलिसांनी अटक केली. आत्तापर्यंत पोलिसांनी या प्रकरणात अत्याचार करणार्‍या दोन आरोपींसह लॉज चालक, कॅफे मालक अशा पाच जणांना अटक केली आहे. मंगळवारी अटक केलेल्या राहुल गौतम भालेराव या कॅफे मालकाला बुधवारी संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश प्रशांत कुलकर्णी यांनी एक दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
संगमनेर शहरालगत राहावयास असलेल्या एका अंदाजे 17 वर्षे वयाच्या मुलीवर संगमनेर, शिर्डी, पेमगिरी, विठ्ठल कडा, कर्‍हे घाट येथे आशिष नानासाहेब राऊत (वय 20 वर्ष) व किरण सोपान राऊत (वय 30 वर्ष, दोघे रा. मालुंजकर मळा, घुलेवाडी, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) या दोघांनी वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला होता. पीडित मुलीच्या तक्रारीवरून संगमनेर शहर पोलिसांनी आशिष नानासाहेब राऊत व किरण सोपान राऊत या दोघा प्रमुख आरोपींसह त्यांना मदत करणार्‍या अत्याचारासाठी कॅफे, लॉज उपलब्ध करून देणार्‍या अन्य पाच जणांना सहआरोपी करत या सर्वांवर भारतीय दंड विधान संहिता कलम 376(2)(एन), 363 आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण प्रतिबंधक कायदा कलम 4, 6, 8, 12 व 17 (पोक्सो) नुसार गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी शहर पोलिसांनी आतापर्यंत अत्याचार करणारे आरोपी आशिष नानासाहेब राऊत, किरण सोपान राऊत यांच्यासह नांदूर शिंगोटे येथील लॉज चालक ज्ञानेश्‍वर किसन क्षीरसागर, शिर्डी येथील लॉज चालक आकाश भास्कर बोंडारे यांना अटक केली असून हे सर्व आरोपी कोठडीत आहेत. याशिवाय मंगळवारी संगमनेरातील कॅफे क्रश बक्सचा मालक राहुल गौतम भालेराव, (राहणार भालेकर वस्ती मालदाड, संगमनेर) याला देखील अटक केली. अद्यापही या गुन्ह्यातील तीन आरोपी फरार असून त्यातील दोघे कॅफे मालक आहेत. एका आरोपीचे नाव निष्पन्न झाले असले तरी त्याची अद्याप पूर्ण ओळख पटलेली नाही. उर्वरित आरोपींना तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव कधी अटक करतात याकडे लक्ष लागले आहे.

COMMENTS