मुंबई ः कोकणच्या विकासाला हातभार लावणारे प्रकल्प येतात तेव्हा त्याला विरोध केला जातो. काही लोक केवळ विरोध करण्याचे काम करतात. खरंतर कोकणाचा विकास

मुंबई ः कोकणच्या विकासाला हातभार लावणारे प्रकल्प येतात तेव्हा त्याला विरोध केला जातो. काही लोक केवळ विरोध करण्याचे काम करतात. खरंतर कोकणाचा विकास करण्याची खरी गरज आहे, त्यासाठी कोकणात मंत्रिमंडळ बैठकीची आवश्यकता असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे.
शीतपेय बनवणारी कंपनी कोका-कोला रत्नागिरीत 2,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहे. कंपनीच्या रत्नागिरीत होऊ घातलेल्या प्रकल्पाच्या 700 कोटी रुपयांच्या पहिल्या टप्प्याचे गुरूवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. यावेळी ते बोलत होते. या प्रकल्पाच्या माध्यमातून कोकणात दोन ते तीन हजार लोकांना रोजगार मिळणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. तसेच उद्घाटनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बातचीत केली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, राज्य सरकार प्राधान्याने कोकणचा विकास करणार आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, कोका-कोला कंपनी महाराष्ट्रात त्यांचा प्रकल्प सुरू करतेय. त्यांना आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा राज्य सरकारकडून पुरवल्या जातील. कोकणचा विकास झाला तर इथल्या तरुणांना-तरुणींना कामासाठी कुटुंब सोडून मुंबई-ठाण्यात जावं लागणार नाही. त्यामुळे आम्ही कोकणच्या विकासाला प्राधान्य देत आहोत. राज्य सरकार केवळ कोकणी माणसाला वापरून घेणार नाही. या कोकणी माणसाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर, शिवसेनेवर प्रेम केलं. परंतु, त्यांना काय मिळालं?
COMMENTS