पुणे ः मुंबई ते पुणे, नाशिक आणि शिर्डी शेअर कॅबच्या भाड्यात 50 ते 200 रुपयांनी वाढ होणार असल्याची माहिती परिवहन विभागाच्या अधिकार्यांनी दिली. मु

पुणे ः मुंबई ते पुणे, नाशिक आणि शिर्डी शेअर कॅबच्या भाड्यात 50 ते 200 रुपयांनी वाढ होणार असल्याची माहिती परिवहन विभागाच्या अधिकार्यांनी दिली. मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने नुकत्याच झालेल्या बैठकीत मुंबईहून नाशिक, शिर्डी, पुणे या तीन मार्गांवरील काळ्या-पिवळ्या टॅक्सी आणि निळ्या-पांढर्या वातानुकूलित टॅक्सीच्या भाड्यात सुधारणा करण्यास मान्यता दिली. टॅक्सी भाड्यात सुधारणा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या खटुआ समितीच्या अहवालानुसार मुंबई टॅक्सी संघटनेने केलेल्या मागण्या लक्षात घेऊन भाडे सुधारण्यास मान्यता देण्यात आली आहे.
COMMENTS