Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्थानिक विक्रेत्यांकडूनच खरेदी करा ः चैतालीताई काळे

कोपरगाव : आपल्या संस्कृतीप्रमाणे वर्षभरात अनेक सण उत्सव साजरे केले जातात. या सण उत्सवाच्या वेळी त्या त्या सणाला बाजारपेठा सजल्या जातात. त्या वेळी

ख्रिस्ती युवकांचा रोजगारांचा प्रश्‍न सोडवू ः दीपकदादा साठे
राज्यात उद्या संध्याकाळी ८ वाजल्यापासून संचारबंदी : मुख्यमंत्री ; “या” अत्यावश्यक सेवा राहणार सुरु
तरुणांमध्ये वाढत चाललेली व्यसनाधिनता चिंताजनक : ज‍िल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगडडा

कोपरगाव : आपल्या संस्कृतीप्रमाणे वर्षभरात अनेक सण उत्सव साजरे केले जातात. या सण उत्सवाच्या वेळी त्या त्या सणाला बाजारपेठा सजल्या जातात. त्या वेळी स्थानिक विक्रेत्यांकडूनच सणाचे साहित्य करावे असे आवाहन जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ. चैतालीताई काळे यांनी केले आहे. भावा बहिणीच्या पवित्र नात्याची साक्ष देणार्‍या रक्षाबंधन सणानिमित्त सौ.चैतालीताई काळे यांनी चिरंजीव आयांश सोबत कोपरगावात राख्या, मेहंदी आदी साहित्याची खरेदी केली. त्यावेळी प्रसार माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, श्रावण महिन्यापासून विविध सण उत्सवांना सुरुवात होत असून दिवाळी पर्यंत विविध सणांसाठी आवश्यक असणार्‍या साहित्याची दुकाने स्थानिक छोटे मोठे व्यावसायिक थाटत असतात. स्थानिक ग्राहकांनी त्यांच्या दुकानात खरेदी करावी अशी माफक अपेक्षा या छोट्या मोठ्या व्यावसायिकांची असते. परंतु सध्या ऑनलाईनचा जमाना असल्यामुळे ऑनलाईन खरेदीकडे नागरिकांचा मोठ्या प्रमाणात कल वाढला आहे. त्याचा फटका स्थानिक बाजारपेठेला बसत असल्यामुळे या स्थानिक व्यावसायिकांच्या मालाची विक्री कमी होऊन पर्यायाने त्यांचे आर्थिक नुकसान होते. ऑनलाईन खरेदीसाठी नागरिकांना विदेशी कंपन्या अनेक आमिष दाखवतात त्यामुळे कधी कधी तर ऑनलाईन खरेदीमुळे फसवणूक सुद्धा होते. हि फसवणूक टाळण्यासाठी व आपल्या बाजारपेठेला उभारी देण्यासाठी स्थानिक व्यावसायिक हे आपलेच भाऊ-बहीण आहेत या भावनेतून नागरिकांनी ऑनलाईन खरेदी टाळून स्थानिक व्यावसायिकांच्या दुकानातच खरेदी करावी असे आवाहन यावेळी सौ. चैतालीताई काळे यांनी केले.

COMMENTS