Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समृद्धीवरील अपघातात बस चालकाचा मृत्यू

अमरावती : समृद्धी महामार्गावर भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. पुण्याहून नागपूरकडे जाणार्‍या लक्झरी बसची ट्रकला जोरदार धडक झाली आहे. या अपघातात

वाढते अपघात चिंताजनक…
अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याची विशेष सर्वसाधारण सभा संपन्न
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द

अमरावती : समृद्धी महामार्गावर भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. पुण्याहून नागपूरकडे जाणार्‍या लक्झरी बसची ट्रकला जोरदार धडक झाली आहे. या अपघातात बस चालकाचा जागीच मृत्यू झाला असून 15 प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास अमरावतीच्या जवळ असणार्‍या धामणगाव येथील मंगरूळ दस्तगीर पोलीस स्टेशन हद्दीत आष्टा नजीक हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, पुणे वरून नागपूर जाणारी ही ट्रॅव्हल्स होती. यामध्ये अंदाजे 30 च्या जवळपास प्रवासी प्रवास करीत होते. दरम्यान, समृद्धी महामार्गावर भरधाव वेगात जाणार्‍या ट्रकला लक्झरी बसची जोरदार धडक बसल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात लक्झरी बसचालक जागीच ठार झाला असून बसच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे.

COMMENTS