सारसनगरला बंद घर फोडले, दागिन्यांची चोरी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सारसनगरला बंद घर फोडले, दागिन्यांची चोरी

अहमदनगर/प्रतिनिधी-नगर शहरात चोरीच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाही आहे. यामुळे नागरिकांमध्ये कमालीची भीती आणि दहशत निर्माण झाली आहे. नुकतेच शहर

व्यंकटेश पतसंस्थाच्या दोन संचालक गजाआड ; २ कोटी अफरातफर घोटाळा प्रकरण
‘ये आझादी झुठी है’ चा नारा आजही खरा वाटतो ः अ‍ॅड.नितीन पोळ
कोपरगाव तालुक्यात मान्सूनपूर्व कामाला वेग

अहमदनगर/प्रतिनिधी-नगर शहरात चोरीच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाही आहे. यामुळे नागरिकांमध्ये कमालीची भीती आणि दहशत निर्माण झाली आहे. नुकतेच शहरातील सारसनगर येथे अज्ञात चोरांनी बंद घराचा दरवाजाचे कडी-कोयंडा व कुलूप तोडून आत प्रवेश केला. आतील सामानाची उचकापाचक करून चार तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व सत्तर हजार रूपये चोरून नेले. ही घटना औसरकर मळा येथे घडली.
शहरातील सारसनगर येथील ओम कॉलनी येथे राहत असलेले भंडारी यांच्या घराचे दरवाजे तोडून मोठी चोरी झाली आहे. भंडारी परिवार दिवाळी सुट्टीनिमित्त राजस्थानला गेले होते. रविवारी सकाळी नगरला आपल्या घरी आले असता घराचे सेंटर लॉक तोडल्याचे त्यांना आढळून आले. दरम्यान चोरट्यांनी घरातील कपाट उचलून शेजारील शेतात नेऊन त्यातील पैसे व सोने-चांदीच्या वस्तू लंपास केल्या. या कपाटामध्ये चार तोळे सोने व सत्तर हजार रुपये तसेच काही चांदीच्या वस्तू चोरीस गेल्या आहेत. घटनास्थळी भिंगार कॅम्प पोलिस पथक व श्‍वान पथक दाखल झाले व पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास कॅम्प पोलिस करीत आहेत.
सारसनगर येथे पियुष भंडारी हे त्यांच्या कुटुंबासह या ठिकाणी राहत आहेत. सारसनगर येथील औसारकर मळ्यामध्ये त्यांचे घर असून ते घर बंद होते. अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरातील दरवाजा तोडून घरामध्ये प्रवेश केला. घरामध्ये असलेल्या 48 हजार 500 रुपये किमतीच्या अंगठ्या व एक तोळा डिझायनर अंगठी यासह इतर ऐवज चोरीला गेलेला आहे. भंडारी हे घरी आल्यानंतर त्यांना घर उघडे दिसले व अनेक वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या दिसल्या. नंतर या घटनेची माहिती त्यांनी भिंगार कॅम्प पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी आले. भंडारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

COMMENTS