Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून विरोधकांचा चहापानावर बहिष्कार

मुंबई/प्रतिनिधी ः राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज सोमवारपासून सुरुवात होत असून, या अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी विरोधकांनी विशेष रण

मलिकांच्या आठ मालमत्तांवर ‘ईडी’कडून टाच
लखनऊ विमानतळावर किरणोत्सर्गी गळती
छगन भुजबळ विजय वडेट्टीवार यांनी तात्काळ मंत्री पदाचा व विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा- करण गायकर 

मुंबई/प्रतिनिधी ः राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज सोमवारपासून सुरुवात होत असून, या अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी विरोधकांनी विशेष रणनीती आखली असून, विविध मुद्दयावरून हे अधिवेशन गाजण्याची चिन्हे आहेत. राज्यातील सत्तांतर झाल्यानंतर आणि ठाकरे गटाच्या हातून शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह निसटल्यानंतर हे अधिवेशन होत आहे. त्यामुळे यावेळी राजकारण तापण्याची चिन्हे आहेत.

राज्यातील राजकारण तापलेले असताना दुसरीकडे राज्याच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. मात्र अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांकडून सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घातला आहे. या पार्श्‍वभूमीवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली आहे. राज्यातील शेतकरी संकटात असताना दुसरीकडे स्वत: सरकार स्वत:चे हसरे चेहरे दाखवण्यासाठी करोडोंचा चुराडा करत असल्याची घणाघाती टीका अजित पवार यांनी केली आहे. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी फिरत असताना लोकांनी आपली कैफियत मांडली. शेतकर्‍यांना सरकारकडून जाहीर केलेली मदतअद्यापही मिळाली नाही. शेतकरी आत्महत्येत वाढ होत असल्याकडे अजित पवार यांनी लक्ष वेधले. वाढत्या महागाईमुळे शेती उत्पादन खर्च वाढला आहे. पण त्या तुलनेत शेतमालाला भाव मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. सोलापूरमधील शेतकर्‍याला कांदा विक्री केल्यानंतर अवघ्या दोन रुपयांचा चेक मिळाला. कांदा उत्पादक शेतकर्‍यांचे प्रश्‍न गंभीर होत चालला आहे. कांदा उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी कांद्यांला चांगला भाव सरकारने जाहीर करून निर्यात वाढवण्यासाठी तातडीने पावले उचलली पाहिजे, अशी मागणी अजित पवार यांनी केली.
विकासकामांमध्ये राजकारण होत असल्याने विकासाच्या प्रक्रियेला फटका बसला आहे. अर्थसंकल्पात मागे मंजूर केलेल्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे विकासकामे ठप्प पडली आहेत. एक महिना तीन दिवसांनी आर्थिक वर्ष संपणार आहे. जिल्हा वर्षिक योजनेचे किती पैसे खर्च झाले, याची माहिती काढावी. अजिबात पैसे खर्च झालेले नाहीत. निधीचे वितरण नाहीये. सरकार तिथे लक्ष देण्यास कमी पडले आहे, असा आरोप अजित पवार यांनी केला आहे. ग्रामीण भागातील विकासासाठी दिला जाणारा निधी वितरित करण्यात आलेला नाही. त्यामुळे खर्चाअभावी हा निधी परत जाणार आहे. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात 52 हजार कोटी रूपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर केल्या. मात्र तिजोरीचा विचार न करता, केवळ मंत्री आणि त्यांच्या आमदारांच्या मतदाररसंघात कोट्यवधींची कामे जाहीर करण्यात आली. मात्र तेवढा निधी सरकारकडे नाही. ही लोकांची फसवणूक आहे, अशी टीका अजित पवार यांनी राज्य सरकारवर केली.

सरकारकडून उधळपट्टी सुरू ः अजित पवारांची टीका – जाहिरातींवर 50 कोटी सरकारने खर्च केले आणि मुंबई महापालिकेने 17 कोटी रुपये जाहिरातींवर खर्च केले आहेत. आपले हसरे चेहरे दाखवण्यासाठी ही उधळपट्टी सुरू आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांना वेतन वेळेवर मिळत नाही आणि दुसरीकडे महामंडळाच्या पानभर जाहिराती प्रसिद्ध होत आहे. हा प्रकार चिड आणणारा आहे, अशी टीका विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केली. तसेच मागील चार महिन्यात मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानावरील जेवणाचे बील 2 कोटी 38 लाख रुपये आले आहे. सरकार चहामध्ये सोन्याचा अर्क टाकते का? असा खोचक सवालही अजित पवार यांनी केला आहे.

COMMENTS