खर्डा येथे युवकाचा निर्घृण खून

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खर्डा येथे युवकाचा निर्घृण खून

जामखेड/प्रतिनिधी : खर्डा येथील युवक विशाल ईश्वर सुर्वे वय ३२ या तरूणाचा अज्ञात व्यक्तींनी निर्घुण खून केला असल्याची घटना घडली आहे. याबाबत खर्डा व परि

म्युकरमायकोसिसची औषधे कोठूनही मागवा l पहा LokNews24
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा अटक ; गुन्हा दाखल
राहुरी तालुका शिवजयंती उत्सव अध्यक्षपदी घाडगे तर उपाध्यक्षपदी आरगडे

जामखेड/प्रतिनिधी : खर्डा येथील युवक विशाल ईश्वर सुर्वे वय ३२ या तरूणाचा अज्ञात व्यक्तींनी निर्घुण खून केला असल्याची घटना घडली आहे. याबाबत खर्डा व परिसरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.याबाबत माहिती अशी की विशाल सूर्वे हा स्वतः ड्रायव्हर होता त्याची स्वतःची चार चाकी टमटम आहे , तो माल वाहतुकीचा व्यवसाय करीत होता. १३ रोजी त्याने खर्डा येथील कापड व्यापाऱ्याच्या कापडाच्या गाठीचे भाडे केले. रात्री कापडाच्या गाठी उतरून तो त्याच्या घरी सुर्वे वस्तीकडे रात्री बाराच्या सुमारास गाडी घेऊन चालला होता परंतु मध्येच अज्ञात व्यक्तींनी त्याची चार चाकी टमटम अडवली व त्याला गाडीच्या बाहेर ओढून त्याच्या डोक्यात लोखंडाचा घाव टाकल्याने तो जागीच गतप्राण झाला. हा सर्व प्रकार दि१४ रोजी सकाळी उघडकीस आल्याने खर्ड्या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

COMMENTS