Homeताज्या बातम्यासंपादकीय

लोकांच्या जाणीव-नेणिवेत त्यांची बोलीभाषा !

भारतीयांना भाषाच येत नाही, अशा प्रकारचे वक्तव्य करून सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे, असेच म्हणावे लागेल. भार

अवकाळीच्या नुकसानीपेक्षा राजकारणच महत्वाचे
राजकारणाचा खरा चेहरा
गांधार भूमीतील अशांततेचा वणवा

भारतीयांना भाषाच येत नाही, अशा प्रकारचे वक्तव्य करून सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे, असेच म्हणावे लागेल. भारतीय भाषाच भारतीय लोकांना येत नाही हे सांगत असताना त्यांनी, पूर्वीची भाषा संस्कृत होती; असे सांगत, आज लोक संस्कृत शिकायला तयार नाहीत आणि शिकवायलाही बाहेर देशातून लोक या ठिकाणी यावे लागतात, असं वक्तव्य त्यांनी केलं. वास्तविक, संस्कृत भाषेची निर्मिती ही प्राकृत भाषेमधून झालेली आहे, हे आतापर्यंत अनेक भाषा तज्ञांनी केलेल्या संशोधनातून स्पष्ट झालेले आहे. भाषा ही नेहमी समाजाची संस्कृती अभिव्यक्त करते. संस्कृती म्हणून जर आपण भारतीय समाजाचं आकलन केलं तर, भारतीय समाजाच्या संस्कृतीमध्ये कायम दोन तट राहिलेले आहेत.  हे दोन तट नेहमीच मानवता आणि विषमता या अनुषंगानेच राहिलेले आहेत. या देशामध्ये भाषेचा जो विकास आणि उगम आहे तो आपली संस्कृती स्पष्ट करतो. सर्वप्रथम भाषेमध्ये जर काही रचना झाली असेल तर माणूस संपन्न अवस्थेत आल्यानंतर, आपला आनंद व्यक्त करण्यासाठी कधी हावभाव, तर कधी त्याचे रूपांतर लिपीत केलं. सुरूवातीला चित्र लिपी आली आणि नंतर आपल्या भावभावनांना शब्दरूप देऊन ते शब्द लिपीबद्ध झाले; असा हा भाषांचा विकास आहे. भारतामध्ये प्राकृत भाषा या सर्वप्रथम आहेत. यामध्ये प्राकृत भाषेमध्ये मागधी, अर्धमागधी, पाली या संपूर्ण भाषेचा संबंध येतो.  याच भाषा त्या काळात लोकभाषा होत्या. भगवान महावीर यांनी आपल्या विचार, तत्त्व आणि संस्कृती निर्माणसाठी अर्धमागधी या भाषेचा वापर केला. तर, बुध्दाने देखील मागधी म्हणजे आज ज्या भाषेला पाली म्हटले जाते त्याच भाषेत प्रचार केला. या संदर्भामध्ये बुद्धा च्या भिक्षू संघामध्ये नव्याने प्रवेश केलेल्या येमेल आणि तेळूक या दोन बौद्ध भिक्षूंनी बुद्धाच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार संस्कृत भाषेत करण्याची परवानगी बुद्धाकडे मागे मागितली होती. त्यावेळी, बुद्धांनी त्या गोष्टीला नकार देत, प्रत्येकाने आपल्या भाषेमध्ये आपल्या या विचारांचा जो लोककल्याणाचा विचार आहे, त्याचा प्रचार-प्रसार करावा; मात्र कुठल्याही परिस्थितीत संस्कृत भाषा त्यांनी वापरू नये आणि तिचा उपयोग करू नये. याचा अर्थ भाषिक संस्कृतीमध्ये देखील या देशामध्ये सांस्कृतिक संघर्ष दडलेला आहे. वास्तविक, संस्कृत भाषा ही आजच्या काळात लोकभाषा नाही आणि नव्हती. सर्वसामान्य जनतेला ती भाषा समजण्याचं कारणही नाही. कारण, त्यांच्या ऐतिहासिक संस्कृतीमध्ये या भाषेचा त्यांनी बोलीभाषा म्हणून कधीही वापर केला नाही. शिवाय, जी भाषा ते शिकले असले तरी त्यांनी प्राचीन साहित्य निर्मितीमध्ये आणि इतिहास जाणून घेण्यातच या भाषेचा उपयोग केला. संस्कृतमध्ये अनेक बहुजन विद्वान झाले. परंतु, ही भाषा लोकांची भाषा न होण्याचं कारण की, या भाषेमध्ये प्राचीन लेखन तेवढं आहे. नवसंशोधन किंवा विज्ञानाचा दृष्टिकोन या भाषेला अद्यापही स्वीकारता आलेला नाही. संस्कृत ही सर्व भाषांची जननी आहे, असा जो प्रचार केला जातो, त्यामध्ये ऐतिहासिक संदर्भ पाहता कोणतेही तथ्य नाही. याउलट, भारतीय लोकांची भाषा ही मागधी आणि अर्ध मागधी अर्थात प्राकृत भाषा राहिली आहे. ज्या भाषेच्या अनुषंगानेच भारतातील देवनागरी लिपीचाही शोध लागला आहे. भारतामध्ये अनेक शिलालेख हे आपल्याला सापडतात. ते देखील ब्राम्ही लिपी मध्ये आहेत. शिलालेख कोणत्याही ठिकाणी संस्कृत भाषेतून सापडलेले नाही. याचा अर्थ लोकांच्या बोलीभाषेशी आणि लोकांना ती भाषा समजण्याशी काहीही संबंध नव्हता, असं इतिहासातील काही संदर्भ पाहता आपल्या लक्षात येते. अर्थात संस्कृत ही येथील विद्वानांची भाषा राहिली. त्यामुळे, त्यामध्ये अनेक प्राचीन ग्रंथांची निर्मिती झाली असली तरी, त्या ग्रंथांचा प्रचार प्रसार या विषयातील बहुजन समाजात होऊ शकला नाही. ही भाषा ना जाणत होते ना जाणण्याची त्यांना आवश्यकता वाटत होती. किंबहुना, ती केवळ पंडितांची भाषा म्हणून ती भाषा समजून घेण्याचे ही त्यांना तेवढं आवश्यक वाटलं नाही. कारण, व्यवहारात आणि विचारात त्यांनी ज्या भाषा अंगीकृत केलेल्या होत्या, त्या भारताच्या बोलीभाषा होत्या. त्यामुळे, भारतीयांची बोलीभाषा असा जेव्हा विचार किंवा अभ्यास पुढे येतो, त्या त्यावेळी मागधी आणि अर्ध मागधी आणि प्राकृत यांचा विचार प्रामुख्याने होतो. या लोकांच्या बोलीभाषा होत्या. आजही आहेत. अर्थात, याच भाषेतून मूळ भारतीय भाषांचा विकास झालेला आहे. त्यामुळे, भारतीय भाषांची जननी ही मूलतः प्राकृत भाषेतून विकसित झालेल्या  भाषेतच भारतीय माणूस आजही आपला संपर्क राखतो.

COMMENTS