Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फार्मसीच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

कोपरगाव ः  जळगाव येथे झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ यांच्या वतीने विद्यापीठाच्या अांतर विभागीय फेन्सिंग स्पर्धा आयोजित क

विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू
जिल्ह्यात अजून सहा पोलिस ठाणी होऊ शकतात…; प्रस्ताव शासनाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत, राजकीय ताकद लावण्याची गरज
उद्यानाची मोडतोड करणे योग्य नाही- नगराध्यक्ष वाहडणे

कोपरगाव ः  जळगाव येथे झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ यांच्या वतीने विद्यापीठाच्या अांतर विभागीय फेन्सिंग स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्यामध्ये कार्तिक मोरे यांनी प्रथम क्रमांक व यशराज  पानसरे आणि  दर्शन नाईक यांनी द्वितीय क्रमांक पटकावला तसेच. भुजबळ साईराज याचे इंद्रायणी महाविद्यालय पुणे मध्ये क्रिकेटमध्ये निवड झाली.
 राष्ट्रसंत जनार्दन स्वामी कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयामध्ये अभ्यासक्रमासोबतच  विद्यार्थ्यांचा बौद्धिक क्रीडा आणि कलात्मक असा सर्वागीण विकास व्हावा यासाठी सर्व शिक्षक वर्ग नेहमी प्रयत्नशील असतात तसेच चेअरमन चांगदेवराव कातकडे हे नेहमी त्यासाठी प्रोत्साहन देतात त्यातूनच विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टीकोन, कला आणि क्रिडा गुणांचा विकास होण्यासाठी त्यांना मार्गदर्शन केले जाते. तसेच विविध महाविद्यालयीन स्पर्धामध्ये भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित केले जाते याचाच परिणाम म्हणून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विविध स्पर्धामध्ये उज्वल यश प्राप्त होत आहे. सर्व यशस्वी  विद्यार्थी व विद्यार्थ्यानीचे संस्थेचे अध्यक्ष  चांगदेवराव कातकडे, संस्थेचे सचिव प्रसाद कातकडे, दीपक कोटमे तसेच फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन जैन, उपप्राचार्य उषा जैन क्रिडा प्रमुख प्रा. चव्हाण सचिन, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी ग्रपू ऑफ इन्स्टिट्यूट व आर. जे. एस स्पोर्ट्स क्लबतर्फे हार्दिक अभिनंदन केले.

COMMENTS