बीड प्रतिनिधी - बीड जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाचे जाळे पसरले आहे. मात्र अशातच पैठण-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाला भेगा पडत असल्याचा प्रकार

बीड प्रतिनिधी – बीड जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाचे जाळे पसरले आहे. मात्र अशातच पैठण-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाला भेगा पडत असल्याचा प्रकार सामाजिक कार्यकर्त्यांनी उघडकीस आणला. हा प्रकार समोर आल्यानंतर महामार्ग प्रशासनाने तात्पुरती डागडूजी केली. मात्र जिल्ह्यातील इतर राष्ट्रीय महामार्गावरील भेगा कायम आहेत. या परिस्थितीमुळे अपघाताला निमंत्रण मिळत असून संबंधित बेजबाबदारपणे काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांमधून होत आहे.
COMMENTS