चमोली ः उत्तराखंडमधील चारधाम यात्रेच्या घोषणेदरम्यान जोशीमठमध्ये पुन्हा एकदा भेगा दिसू लागल्या आहेत. यावेळी जोशीमठ-बद्रीनाथ महामार्गावर 10 हून अध

चमोली ः उत्तराखंडमधील चारधाम यात्रेच्या घोषणेदरम्यान जोशीमठमध्ये पुन्हा एकदा भेगा दिसू लागल्या आहेत. यावेळी जोशीमठ-बद्रीनाथ महामार्गावर 10 हून अधिक मोठ्या भेगा पडल्या आहेत. हा महामार्ग गढवाल हिमालयातील सर्वात मोठ्या तीर्थक्षेत्रांपैकी एक असलेल्या बद्रीनाथ मंदिराला जोडतो. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, जोशीमठ ते मारवाडीपर्यंत 10 किमीपर्यंत या भेगा आहेत. चमोली जिल्ह्याचे डीएम म्हणाले की, एक तपास पथक घटनास्थळी पाठवण्यात आले आहे. तपासानंतर हे पथक प्रशासनाला अहवाल सादर करणार आहे. त्यानंतर याप्रकरणी पुढील कारवाई केली जाईल.
COMMENTS