किनवट प्रतिनिधी - विदर्भातील यवतमाळच्या वनी येथिल रेती बिड जिल्ह्यातील आंबाजोगाई येथे घेऊन जात असल्याच्या सबबीखाली रेतीची तस्करी चालू असल्याचा प्

किनवट प्रतिनिधी – विदर्भातील यवतमाळच्या वनी येथिल रेती बिड जिल्ह्यातील आंबाजोगाई येथे घेऊन जात असल्याच्या सबबीखाली रेतीची तस्करी चालू असल्याचा प्रकार तहसिलदारांच्या लक्षात आली. मंगळवारी (09 मे) किनवटच्या धाडशी तहसिलदार डॉ.मृणाल जाधवांनी तलाठी सचिन भालेराव आणि तलाठी अंकूर सकवान यांना सोबत घेऊन सुभाषनगर परिसरातील उद्यानाजवळ टिपर गाडी नं.एम.एच.43-बी.पी.2837 पकडून तहसिल कार्यालयात लावले. त्यानंतर हायवागाडी नं.एम.एच.26-बी.ई.333 या दोन गाड्या धरुन कार्यवाही करण्यास यश मिळाले. यापुर्वीही टिपरं धरले होते. कायम जप्तीची कार्यवाहीची तरतूद असेल तर का केली जात नाही. तलाठ्यांना धमक्या आणि हात उचलत असतील तर कार्यवाही व्हायलाच हवी. किनवट व माहूर तालुक्यात अथवा पैनगंगेतील रेतीघाटाचा लिलाव झालेला नाही. महाराष्ट्र सरकारने कठोर निर्बंध घातल्यानंतरही माहूर आणि किनवट तालुक्यात प्रचंड रेती तस्करी चालू आहे. वाहतूक पावत्या जरी विदर्भातील असल्या तरी रेती मात्र माहूरची आहे हे माध्यमांनी दररोज दिलेल्या प्रसिद्धीवरुन दिसते. 9 एप्रिल रोजी तहसिलदार डॉ.मृणाल जाधव यांनी तलाठ्यांच्या मदतीने एस.व्ही.एम./सुभाषनगर परिसरातील उद्यानाजवळ टिपर नम्बर एम.एच. 43-बी.पपी.2837 गाडीतील रेती वाहतुकीची ई पावती नम्बर 10654380 चे आणि दुसरी हायवागाडी नंबर एम.एच.26 बी.ई.333 या दोन्ही गाड्यांचे जी.पी.एस.लोकेशन तपासले असता सदरिल वाहनांची जाण्याचे व निघण्याचे ठिकाण संशयस्पद आढळून आल्यावरुन कार्यवाही केली. सदरील वाहनं गोंडेगाव-माहूर ते किनवट अशा प्रकारचे लोकेशन दिसून आले. 9 मे 2023 वेळ 12.10 मिनिट सिरमेटी किनवट वरून निघून 1.18 (एएम) माहूर-गोंडेगाव, त्यानंतर तिथून निघून 6.52 (एएम) मिनिट किनवटला आले. पुन्हा गोंडेगाव पोहोचून त्यानंतर 11 (एएम) वाजता किनवट येथे आल्याचे दिसून येते. या गाड्यांची ईटीपी लोकेशन विदर्भाच्या यवतमाळ जिल्ह्यातील वनी ते बीड जिह्ह्यातील अंबाजोगाई आहे. घोटीफाट्यावर कायमस्वरुपी बैठे पथक कार्यान्वित करण्याच्या मागणीचे निवेदन पत्रकार बी.एल.कागणे, पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सुरेश कावळे, मलिक चौहाण, कामराज माडपेल्लीवार यांनी तहसिल कार्यालयात सादर केले असून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि नांदेड जिल्हाधिकार्यांकडे पाठवले आहे.
COMMENTS