एक्सप्रेसवर कंटेनरचा झाला ब्रेक फेल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एक्सप्रेसवर कंटेनरचा झाला ब्रेक फेल

अपघाताचा थरार मोबाईलमध्ये कैद

मुंबई प्रतिनिधी - पुणे-मुंबई यशवंतराव चव्हाण एक्स्प्रेस वेवर एक थरार बघायला मिळाला. पुण्यावरून मुंबईला जाणाऱ्या कंटेंनरचा खंडाळा बोरघाटात ब्रेक फेल

झारखंडमध्ये अपघातात सहा जणांचा मृत्यू
सिन्नर -शिर्डी राज्य मार्गावर खाजगी आराम बस आणि ट्रकचा भीषण अपघात
मुंबई- पुणे हायवेवर अपघातात तिघांचा दुर्देवी मृत्यू

मुंबई प्रतिनिधी – पुणे-मुंबई यशवंतराव चव्हाण एक्स्प्रेस वेवर एक थरार बघायला मिळाला. पुण्यावरून मुंबईला जाणाऱ्या कंटेंनरचा खंडाळा बोरघाटात ब्रेक फेल झाला आणि चालकाच्या मनात धडकी भरली. भल्या मोठ्या कंटेनरचा ब्रेक फेल झाल्यामुळे त्यावर नियंत्रण आणणं अवघड होतं.  एकतर समोरच्या गाडीला धडक किंवा घाटात गाडी जाणार हे नक्की होतं. मात्र त्या कठीण काळातही चालकाने क्लृप्ती लढवली. उतारावर ब्रेक निकामी झाल्याने कंटेनरने पुढे जाणाऱ्या एका कंटेनरला धडक दिल्यावर ही चालकाने शिताफीने कंटेनरवर ताबा मिळविला.पुण्यावरून मुंबईला जाणाऱ्या कंटेंनरचा खंडाळा बोरघाटात ब्रेक फेल झाला आणि चालकाच्या मनात धडकी भरली. भल्या मोठ्या कंटेनरचा ब्रेक फेल झाल्यामुळे त्यावर नियंत्रण आणणं अवघड होतं. यात तो जखमी झाला. मात्र दैव बलवत्तर होते म्हणून मोठी दुर्घटना टळली. हा सर्व थरार एका वाहन चालकाने आपल्या मोबाईल मध्ये कैद केला.

COMMENTS