Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगावमध्ये ब्रम्हगौरव गुणगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

कोपरगाव शहर ः कोपरगाव ब्राम्हण सभा आयोजित ब्रम्हगौरव गुणगौरव पुरस्कार व आमदार आशुतोष काळे यांच्या 10 लाख रुपयांच्या निधीतून उभे राहिलेल्या भोजनगृ

दैनिक लोकमंथन l महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी टाळेबंदी
पुरुषवाडी व वांजुळशेत शाळेची अव्वल कामगिरी
जयहिंद लोक चळवळीच्या ग्लोबल कॉन्फरन्स मध्ये शनिवारी व रविवारी खा.सुप्रिया सुळे,सत्यजीत तांबेंसह विविध मान्यवर

कोपरगाव शहर ः कोपरगाव ब्राम्हण सभा आयोजित ब्रम्हगौरव गुणगौरव पुरस्कार व आमदार आशुतोष काळे यांच्या 10 लाख रुपयांच्या निधीतून उभे राहिलेल्या भोजनगृहाचे उदघाटन राज्यसभेच्या खासदार मेधा यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या जल्लोषात संपन्न झाला. या प्रसंगी आमदार आशुतोष काळे,  माजी आमदार स्नेहलता कोल्हे, विश्राम कुलकर्णी, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई,ऐश्‍वर्यालक्ष्मी सातभाई, ब्राम्हण सभेचे अध्यक्ष मकरंद कोर्‍हाळकर, उद्योजक प्रसाद नाईक,मेंदुरोग तज्ञ डा.डुबेरकर आदि उपस्थित होते.
यावेळी दहावी ,बारावी व पदवीधर परीक्षेत यशस्वी झालेल्या समाजातील विद्यार्थ्यांना विशेष गुणगौरव करण्यात आला. विविध क्षेत्रात विशेष कार्य करणार्‍या समाजबांधवांचा ब्रम्हगौरव पुरस्कार देवून यावेळी सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक अध्यक्ष मकरंद कोर्‍हाळकर यांनी केले तर खासदार मेधा कुलकर्णी, आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक प्रसाद नाईक आदींनी आपले मनोगत व्यक्त करत सर्वाना शुभेच्छा दिल्या. ब्राम्हण सभेचे उपाध्यक्ष गोविंद जवाद, बाळकृष्ण कुलकर्णी, सचिव सचिन महाजन,सहसचिव संदीप देशपांडे, खजिनदार जयेश बडवे, सहखजिनदार  योगेश कुलकर्णी, संघटक महेंद्र कुलकर्णी, गौरीश लव्हरीकर,जेष्ठ मार्गदर्शक सुधाप्पा कुलकर्णी, माजी नगराध्यक्षा ऐश्‍वर्यालक्ष्मी सातभाई, बांधकाम समितीप्रमुख प्रसाद नाईक, वसंतराव ठोंबरे, संजीव देशपांडे, डॉ. मिलिंद धारणगावकर, अनिल कुलकर्णी, अड. श्रद्धा जवाद, वंदना चिकटे, अजिंक्य पदे, सदाशिव कुलकर्णी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परीश्रम घेतले. यावेळी ब्राम्हण सभेचे पदाधिकारी, समाज बांधव,गुणवंत विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन सुनिता कोर्‍हाळकर, वृषाली कुलकर्णी यांनी केले. आभार सहसचिव संदीप देशपांडे यांनी मानले.

COMMENTS