Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उद्योगपतीच्या मुलाच्या कारने दोघांना चिरडले

पुणे ः पुण्यातील कल्याण नगर परिसरात शनिवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने धावणार्‍या आलिशान कारने दुचाकीला धडक दिल्याने दोघांचा जागीच

घाटात भलामोठा दगड कारवर आला दोघांचा मृत्यू, 3 जण जखमी
एकदिवसीय क्रिकेटचा नवा बादशहा कोण होणार ?
कर्जबुडवे आणि हिंडेनबर्ग अहवाल

पुणे ः पुण्यातील कल्याण नगर परिसरात शनिवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने धावणार्‍या आलिशान कारने दुचाकीला धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. अनिश अवधिया आणि अश्‍विनी कोष्टा अशी मृत्यूमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकिब रमजान मुल्ला याने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. कारचालक असलेल्या 17 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी तरुण आणि त्याचे मित्र कल्याणीनगर परिसरातील बॉलर हॉटेलमध्ये पार्टी करुन घरी परत जात होते. त्याचवेळी कल्याणीनगर-एअरपोर्ट रोडवर नंबर प्लेट नसलेल्या एका आलिशान कारने दुचाकीला जोरात धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की दुचाकी वरील अनिस अवधिया आणि अश्‍विनी कोस्टा दूरवर फेकले गेले. रस्त्यावर जोरात आपटल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. मध्यरात्री घटलेला हा प्रकार पाहून कल्याणी नगर परिसरातील अनेक आजूबाजुला असलेले नागरिक गोळा झाले आणि सतरा वर्षीय भरधाव कारचालक असलेल्या मुलाला नागरिकांनी चांगलाच चोप दिला. कारचालक पळून जाण्याच्या तयारीत होता मात्र त्याला नागरिकांनी भररस्त्यात अडवून धरलं आणि रस्त्यातच त्याला मारायला सुरुवात केली. त्यानंतर घटनास्थळी पोलिस दाखल झाले आणि नागरिकांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. हा सतरा वर्षीय मुलगा पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपतीचा मुलगा असल्याची चर्चा आहे. मात्र यासंदर्भात अजून अधिकृत कोणतीही माहिती समोर आली नाही आहे.

COMMENTS