Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खांद्यावर हात ठेवून दोघांनी 25 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन पळवली 

अहमदनगर : पाळीव कुत्र्याला फिरवण्यासाठी घराच्या पाठीमागील मोकळ्या जागेत गेलेल्या 35 वर्षीय इसमाची ओळख नसताना दोन अनोळखी तरुणांनी त्यांच्या खांद्य

ऑक्सिजन देणाऱ्या वृक्ष लागवडीसाठी लोकचळवळ निर्माण व्हावी :- फिरोजभाई पठाण
पेट्रोल-डिझेल महागले…चला घोड्यावर ; काँग्रेसचे नगरमध्ये अभिनव आंदोलन
अहमदनगर मर्चंटस सहकारी बँकेला 13 लाखाचा दंड ; रिझव्ह्र बँकेने दिला आदेश, गैरव्यवस्थापनाचा ठपका

अहमदनगर : पाळीव कुत्र्याला फिरवण्यासाठी घराच्या पाठीमागील मोकळ्या जागेत गेलेल्या 35 वर्षीय इसमाची ओळख नसताना दोन अनोळखी तरुणांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवून  बोलण्याचा बहाणा करीत गळ्यातील 25 ग्रॅम वजनाची सोन्याची सोन्याची चैन हिसका मारून ओढून तोडून चोरुन नेली. ही घटना नगर कल्याण रोडवरील वसुंधरा पार्क विद्या टॉवरच्या पाठीमागे घडली. याबाबतची माहिती अशी की  स्वप्निल मोहन वाघ (वय 35 राहणार वसुंधरा पार्क विद्या टॉवरच्या मागे कल्याण रोड, अहमदनगर) हे रविवारी सायंकाळी त्यांचा पाळीव कुत्रा फिरवण्यासाठी घराच्या पाठीमागील मोकळ्या जागेत गेले असता दोन वीस ते पंचवीस वयोगटाचे अनोळखी पुरुष त्यांच्याजवळ आले व त्यांनी स्वप्निल वाघ यांच्या खांद्यावर हात ठेवून तू येथे काय करत आहेस असे विचारले. त्यावर वाघ यांनी तुम्हाला काय करायचे असे म्हटल्यावर त्यापैकी एकाने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसका देऊन खाली ढकलून दुखापत करून चेन ओढून तोंडून चोरून नेली.

याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी स्वप्निल वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय दंड विधान कायदा कलम 394 अन्वये जबरी चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली अधिक तपास पोलीस करीत आहेत.

COMMENTS