Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दोघा भावांनी केली घरावर दगडफेक

अहमदनगर/प्रतिनिधी ः दुचाकीवरून आलेल्या दोघा भावांनी एका घरावर दगडफेक केली. केडगाव उपनगरातील शाहूनगरमध्ये बुधवारी रात्री ही घटना घडली. या प्रकरणी

१७ वर्षांखालील खेळाडूंसाठी जिल्हास्तरीय बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धा.                
राहुरीत भाजीपाला विकणार्‍या शेतकर्‍यांची हेळसांड
आपण पवार कुटुंबियासोबतच राहणार

अहमदनगर/प्रतिनिधी ः दुचाकीवरून आलेल्या दोघा भावांनी एका घरावर दगडफेक केली. केडगाव उपनगरातील शाहूनगरमध्ये बुधवारी रात्री ही घटना घडली. या प्रकरणी प्रिया सुनील शिरसाठ (वय 32) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चंद्रकांत साळवे व त्याचा भाऊ (नाव, पत्ता माहिती नाही) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादीची मुलगी घराच्या बाहेर मोबाईल पाहात बसली होती. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या चंद्रकांत व त्याच्या भावाने गेटच्या बाहेरून घराच्या दिशेने दगड फेकला. दगड मुलीच्या मोबाईलवर पडून नुकसान झाले आहे. फिर्यादी व त्यांचे पती घराच्या बाहेर येताच चंद्रकांत व त्याचा भाऊ पळून गेले. जाताना शिवीगाळ करीत तुम्हाला दाखवतो, असे म्हटले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

COMMENTS