Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्जत तालुक्यात डिजिटल शाळा संकल्पनेला बळ

चिंचोली काळदाते शाळेस 65 इंची संवादात्मक डिजिटल पॅनल कर्जत : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक व गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी मिळावी, या उद्देशान

पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन
संस्कृतीमध्ये भाषा व कलांचा मोठा वाटा : हांडे
हिंदू हा विश्वातील सर्वात प्राचीन धर्म : ह.भ.प. राऊत

चिंचोली काळदाते शाळेस 65 इंची संवादात्मक डिजिटल पॅनल
कर्जत : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक व गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी मिळावी, या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या डिजिटल शाळा संकल्पनेला आणखी बळ मिळाले आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चिंचोली काळदाते येथे 65 इंची संवादात्मक (इंटरक्टिव्ह) डिजिटल पॅनल प्राप्त झाला आहे. हा पॅनल महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती माननीय प्रा. राम शिंदे यांच्या पुढाकारातून आमदार स्थानिक विकास कार्यक्रम (सन 2025-26) अंतर्गत मंजूर करण्यात आला आहे.
याबाबत उपसरपंच गणेश काळदाते आणि भाजपचे सरचिटणीस नंदलाल काळदाते यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, चिंचोली काळदाते येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ग्रामीण भागातील असून शैक्षणिक दर्जाच्या बाबतीत ती अग्रेसर आहे. या शाळेत गरीब व शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेत असून, त्यांनाही आधुनिक डिजिटल शिक्षण मिळावे, या हेतूने विधान परिषदेचे सभापती माननीय प्रा. राम शिंदे यांच्याकडे डिजिटल पॅनलची मागणी करण्यात आली होती. या मागणीची तात्काळ दखल घेत प्रा. शिंदे यांनी आवश्यक मंजुरी दिली. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांकडे संवेदनशीलतेने पाहत तत्काळ निर्णय घेऊन सुविधा उपलब्ध करून देण्याची प्रा. राम शिंदे यांची कार्यतत्परता यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित झाली आहे. या संवादात्मक डिजिटल पॅनलमुळे विद्यार्थ्यांना दृश्य-श्राव्य माध्यमातून अभ्यास करता येणार असून अध्यापन-अध्ययन प्रक्रिया अधिक प्रभावी, आकर्षक आणि आधुनिक होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आकलनक्षमतेत वाढ होण्यास मदत मिळेल, असा विश्‍वास व्यक्त करण्यात आला आहे. या उपक्रमाबद्दल माजी विद्यार्थी संघ, शाळा व्यवस्थापन समिती, पालक वर्ग तसेच शाळा प्रशासनाच्या वतीने माननीय प्रा. राम शिंदे यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील शाळांपर्यंत तंत्रज्ञानाधिष्ठित शिक्षण पोहोचवण्याच्या त्यांच्या दूरदृष्टीचे हे उत्तम उदाहरण असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. शिक्षण क्षेत्रात सातत्याने सकारात्मक व भविष्याभिमुख निर्णय घेणारे नेतृत्व म्हणून माननीय प्रा. राम शिंदे यांची भूमिका विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रेरणादायी ठरत असल्याचेही गणेश काळदाते व नंदलाल काळदाते यांनी नमूद केले.

COMMENTS