Homeताज्या बातम्यादेश

इंडिगो विमानात बॉम्बची धमकी

लखनऊ येथे आपत्कालीन लँडिंगलखनऊ : दिल्लीहून पश्‍चिम बंगालमधील बागडोगरा येथे जाणार्‍या इंडिगो एअरलाइन्सच्या एका विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्या

पिंप्री राजा येथे कन्या दिन उत्साहात ; मुलींच्या जन्माचे स्वागत करा : जिल्हाधिकारी स्वामी
ठेकेदाराने दिली मजुरांना दिवाळीची परस्पर सुट्टी..
‘रेषा बोलतात…रेषा हसवतात !’ विद्यार्थ्यांसाठी प्रबोधनात्मक व्यंगचित्रांचा अनोखा कार्यक्रम.

लखनऊ येथे आपत्कालीन लँडिंग
लखनऊ : दिल्लीहून पश्‍चिम बंगालमधील बागडोगरा येथे जाणार्‍या इंडिगो एअरलाइन्सच्या एका विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्याने रविवारी सकाळी एकच खळबळ उडाली. सुरक्षेच्या दृष्टीने तत्काळ निर्णय घेत विमानाचे लखनऊ विमानतळावर सुरक्षित आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.
एअर ट्रॅफिक कंट्रोलला रविवारी सकाळी 8.46 वाजता इंडिगोच्या 6 ई-6650 या उड्डाणाबाबत संशयास्पद माहिती मिळाली. त्यानुसार सर्व सुरक्षा प्रोटोकॉल अमलात आणत विमानाला सकाळी 9.17 वाजता लखनऊकडे वळवण्यात आले. विमान सुरक्षितरीत्या उतरल्यावर सर्व प्रवाशांना कोणतीही घाई-गडबड न करता बाहेर काढण्यात आले. तपासादरम्यान विमानाच्या शौचालयात टिश्यू पेपरवर लिहिलेली एक हस्तलिखित चिठ्ठी आढळून आली होती, ज्यामध्ये विमानात बॉम्ब असल्याचा उल्लेख होता. ही माहिती मिळताच विमानाला आयसोलेशन बेमध्ये हलवण्यात आले आणि बॉम्ब निकामी पथकासह विविध सुरक्षा यंत्रणांनी सखोल तपास सुरू केला. या विमानात आठ अर्भकांसह एकूण 222 प्रवासी होते. त्याशिवाय दोन वैमानिक आणि पाच केबिन क्रू मेंबर्सही उपस्थित होते. बॉम्ब स्क्वॉड, अग्निशमन दल, वैद्यकीय पथक तसेच विमानतळ प्रशासनाने संयुक्तपणे तपास प्रक्रिया राबवली. सरोजिनी नगर पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, माहिती मिळताच सर्व मानक कार्यपद्धतींचे काटेकोर पालन करण्यात आले. प्रवासी आणि कर्मचारी पूर्णपणे सुरक्षित असून, कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती नियंत्रणात आहे. संबंधित यंत्रणा या घटनेचा सखोल तपास करत असून आवश्यक ती पुढील कारवाई सुरू आहे. विमानतळ परिसरात खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.

COMMENTS