Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नालासोपार्‍यात बॉडी बिल्डरचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मुंबई ः बदलती लाईफस्टाईल यामुळे तरुणांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढले आहे. अशीच एक दु:खद घटना मुंबईजवळच्या नालासोपार्‍यातून समोर आली आ

महाराष्ट्राचे पाणी पळवण्याचा कर्नाटकाचा डाव
बालविवाहाच्या घटना रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा : रुपाली चाकणकर
हुकूमशाही दारापर्यंत पोहोचली

मुंबई ः बदलती लाईफस्टाईल यामुळे तरुणांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढले आहे. अशीच एक दु:खद घटना मुंबईजवळच्या नालासोपार्‍यातून समोर आली आहे. नालासोपार्‍यातील एका 27 वर्षीय बॉडी बिल्डरचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने या बॉडी बिल्डरचे निधन झाले आहे. अजिंक्य कदम असे या बॉडी बिल्डरचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अचानक अजिंक्यच्या छातीत दुखू लागले आणि अस्वस्थ वाटू लागले होते. कुटुंबियांनी तातडीने त्याला जवळच्या महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचाराआधीच त्यांचे निधन झाले. डॉक्टरांना दिलेल्या माहितीनुसार हृदयविकाराच्या झटक्याने अजिंक्यचे निधन झाले आहे.

COMMENTS