भाजपचा देवेंद्र फडणवीस यांना धक्का

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजपचा देवेंद्र फडणवीस यांना धक्का

मुंबई :महाराष्ट्राच्या राजकारणात गुरुवारी पुन्हा एकदा भाजपचे धक्कातंत्र बघायला मिळाले. शिंदे गटाकडून देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असावे अशी मागण

नाथजल बाटलीबंद पाण्याची वाढीव दराने विक्री
राहुरीत निवडणूक प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर
सूनेकडून सेवानिवृत्त पोलीस सासर्‍याला जीवे मारण्याचा प्रयत्न| LOKNews24

मुंबई :महाराष्ट्राच्या राजकारणात गुरुवारी पुन्हा एकदा भाजपचे धक्कातंत्र बघायला मिळाले. शिंदे गटाकडून देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असावे अशी मागणी होत होती. मात्र भाजपने अनपेक्षितपणे देवेंद्र फडणवीस यांना धक्का देत, त्यांना उपमुख्यमंत्री पदावर बसवण्यात आले. खरे तर 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस पाच वर्षे मुख्यमंत्रीपदावर विराजमान होते. असे असतांना त्यांची वरचे पद देण्याऐवजी भाजपने त्यांना उपमुख्यमंत्रीपदावर बसवून कोणती खेळी खेळली, यावर राज्यात बरीच चर्चा सुरु झाली आहे. या सरकारमध्ये मी कोणताही मंत्री नसेन पण भाजपचे आमदार मंत्रिमंडळाची शपथ घेतील, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. मात्र काही तासांच्या राजकीय नाटयानंतर देवेंद्र फडणवीस यांचे नाव उपमुख्यमंत्री पदासाठी भाजपने घोषित केले. आणि फडणवीस यांनी देखील त्याला मान्यता देत शपथ घेतल्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत वाद तर सुरु नाही, ना अशी चर्चा झडतांना दिसून येत आहे.

COMMENTS