Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजपचे गलिच्छ राजकारण ः विजय कुंभार

पुणे/प्रतिनिधी ः महाराष्ट्राच्या राजकारणात काल भ्रष्टाचाराचा आणखी एक भूकंप झाला. भाजपने प्रत्येक भ्रष्टाचार्‍याला पक्षात घेऊन त्यांच्यावरील कारवा

तुर्की-सीरियात हाहाकार! भूकंपामुळे आतापर्यंत 11 हजार लोकांचा मृत्यू
Ahmednagar : सेप्टिक टँकमध्ये पडून घर मालकासह दोघांचा मृत्यू | LOKNews24
संसदेची सुरक्षा आणि त्या तरूणांची मानसिकता

पुणे/प्रतिनिधी ः महाराष्ट्राच्या राजकारणात काल भ्रष्टाचाराचा आणखी एक भूकंप झाला. भाजपने प्रत्येक भ्रष्टाचार्‍याला पक्षात घेऊन त्यांच्यावरील कारवाई बंद करण्याची परंपरा सुरू केली आहे. याद्वारे भाजपाने महाराष्ट्रात सुरू केलेल्या गलिच्छ राजकारणाचा राज्यातील 13 कोटी जनतेला फटका बसणार आहे, अशी टीका आम आदमी पक्षाचे नेते विजय कुंभार यांनी सोमवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.
भाजपचा कायद्याची मोडतोड करून सत्ता ताब्यत घेण्याचा प्रयत्न करत आहे. याद्वारे संविधानाची पायमल्ली करण्याचा त्यांचा डाव आहे, असेही ते यावेळी म्हणाले. विजय कुंभार म्हणाले की, एकनाथ शिंदे, नारायण राणे, अजित पवार आदी वेगवेगळे मोहरे वेगवेगळ्या आघाड्यांवर पाठवून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना व्यवस्थित हाताळत आहेत. भ्रष्टाचाराने माखलेले चेहरे घेवून भाजपा देशात अस्थिरता निर्माण करत आहे. कुंभार पुढे म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणात घडणार्‍या या घटनांमुळे संतप्त व दु:खी झालेल्या जनतेने हे लक्षात घेतले पाहिजे की, भारतातील पारंपरिक राजकीय पक्षांचे नेते जनतेच्या सेवेसाठी राजकारणात नाहीत. तर ते सत्ता, भ्रष्टाचार, प्रसिद्धी, आर्थिक फायद्यासाठी राजकारणात आहेत. ते विचारधारा, पक्ष किंवा जनतेशी एकनिष्ठ राहू शकत नाहीत. हे लोक सेवेमुळे नाही तर त्यांच्या जाती, कौटुंबिक पार्श्‍वभूमी आणि पैशाच्या ताकदीमुळे निवडून आलेत. अशा राजकारण्यांना भाजपा ईडी, सीबीआय, प्राप्तिकर खात्याच्या कारवाईचा बडगा दाखवून पक्ष बदलण्यास किंवा आपल्याला सहकार्य करण्यास भाग पाडत आहे. आप एकमेव असा पक्ष सीबीआय व ईडीच्या चुकीच्या कारवाईनंतरही अखंड आणि वैचारिकदृष्ट्या एकजूट असल्याचा दावाही कुंभार यांनी यावेळी केला. चिखलाच्या राजकारणात आदर्श म्हणून उभे राहण्याची ताकद केवळ आपकडे ताकद आहे. महाराष्ट्राच्या जनतेला सुगीचे दिवस केवळ आम आदमी पार्टीच आणू शकते. हे दिल्ली व पंजाबमध्ये दिसून येत आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

COMMENTS