Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

किनवट रेल्वे स्थानकावरील असुविधांबाबत भाजप युवा मोर्चा आक्रमक; प्रशासनाला निवेदन

किनवट । प्रतिनीधीकिनवट रेल्वे स्थानकावरील अपूर्ण सोयीसुविधा आणि विकासकामांच्या दर्जाबाबत प्रवाशांमध्ये नाराजी असून, या प्रश्नी भारतीय जनता युवा मो

अन्यथा महिला मुंडन करून सरकारचा निषेध करणार (Video)
स्व.अजित दादांच्या निधनामुळे शिवजयंती निमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम रद्द
Beed :शरद जाधव यांचे अमृता नदीत जलसमाधी आंदोलन (Video)

किनवट । प्रतिनीधी
किनवट रेल्वे स्थानकावरील अपूर्ण सोयीसुविधा आणि विकासकामांच्या दर्जाबाबत प्रवाशांमध्ये नाराजी असून, या प्रश्नी भारतीय जनता युवा मोर्चाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजप युवा मोर्चाचे नांदेड जिल्हाध्यक्ष तथा किनवट मंडळाध्यक्ष स्वागत आयनेनिवार यांनी दक्षिण मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांना यासंदर्भात निवेदन देऊन तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली आहे.
स्थानकाच्या पूर्व भागातील सुभाष नगर, मांडवा, बेल्लोरी आणि स.वि.म. परिसरातील प्रवाशांना प्लॅटफॉर्म क्रमांक 2 कडे जाण्यासाठी थेट रस्ता उपलब्ध नाही. यामुळे वृद्ध आणि रुग्णांना मोठा वळसा घालून मुख्य प्रवेशद्वाराकडे जावे लागते. या ठिकाणी त्वरित रस्ता आणि पार्किंगची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली आहे. नवनिर्मित शिवाजी नगर रेल्वे अंडरब्रिजच्या कामाबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. येथील रस्त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून, वाहनचालक आणि परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. धुळीचा त्रास कमी करण्यासाठी या ठिकाणी तातडीने सिमेंट काँक्रिटीकरण (उउ) किंवा दर्जेदार डांबरीकरण करण्याची गरज निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. कामाचा दर्जा समाधानकारक नसल्याने, जोपर्यंत रस्ता आणि स्वच्छतेचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत संबंधित कंत्राटदाराची बिले थांबवण्यात यावीत, अशी ठाम भूमिका स्वागत आयनेनिवार यांनी घेतली आहे. निवेदन सादर करतेवेळी सामाजिक कार्यकर्ते अभिजित बोनगीरवार, केतन तिरमनवार व इतर पदाधिकारी उपस्थित होते. रेल्वे प्रशासन आता या जनहिताच्या मागण्यांवर काय पावले उचलते, याकडे किनवटवासीयांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS