इस्लामपुर / प्रतिनिधी : राज्यातील सत्ता बदलानंतर मंत्री मंडळातील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह पोलीस खात्यातील अनेक अधिकार्यांनी कोट्यवधी
इस्लामपुर / प्रतिनिधी : राज्यातील सत्ता बदलानंतर मंत्री मंडळातील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह पोलीस खात्यातील अनेक अधिकार्यांनी कोट्यवधीचे अर्थिक घोटाळे केल्याचे चौकशीत पुढे आले. यावरून राज्य सरकारासह खाकी वर्दीची पुर्णतः नाचक्की व बदनामी झाली. खाकी वर्दीतील भ्रष्टाचार जनतेसमोर आला. अशा वसुलीत वाळवा व शिराळा तालुक्यातील पोलिसही मागे नाहीत. त्यांचे गैरकाभाराचे काही व्हिडीओ उपलब्ध असून योग्यवेळी भाजपाने न्यायालयात सादर केले जाणार आहेत. दोन्ही वाळवा व शिराळा तालुक्याचा क्राईम रेट वाढत चालला आहे. अवैद्य व्यवसाय करणार्या टोळक्याबरोबर खाकी वर्दी ही अर्थिक दृष्ट्या गब्बर बनत चालली आहे. दोन्ही तालुक्यात मटका, दारू, तीनपानी, सावकारी, व्हिडिओ गेम, लॉजिंग यासारखे अनेक अवैद्य व्यवसाय खाकी वर्दीच्या कृपाअशिर्वादाने राजरोसपणे सुरू आहेत. हे अवैध व्यवसाय दि. 15 मार्चपर्यंत बंद झाले नाहीत तर वाळवा तालुका भाजपाच्या वतीने बंद केले जातील, असा इशारा वाळवा तालुका भाजपाचे अध्यक्ष धैर्यशील मोरे यांनी पत्रकार परीषदेत दिला.
वाळवा व शिराळा तालुक्यात पोलिसांच्या कृपा आशिर्वादाने सुरू असलेल्या अवैद्य व्यवसायाचा पोलखोल करण्यासाठी वाळवा तालुका भाजपच्या वतीने यांनी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बैठकीला वाळवा तालुका ओबीसी सेलचे अध्यक्ष मधुकर हुबाले, वाळवा तालुका भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा सुरेखाताई जगताप, वाळवा तालुका भाजपा उपाध्यक्ष निवास पाटील, भाजपा जिल्हा सरचिटणीस संजय हवलदार, इस्लामपूर शहर भाजपा अध्यक्ष अशोकराव खोत, चंद्रकांत पाटील, संदीप सावंत, सरचिटणीस दादासाहेब रसाळ, यदुराज थोरात, प्रविण परीट, अक्षय कोळेकर उपस्थित होते.
धैर्यशील मोरे म्हणाले, वाळवा व शिराळा तालुक्यात दारू, शिंदी, मटका, मुरूम, वाळू वाहतुक, व्हिडिओ गेम, ऑनलाईन लॉटरी सेेंटर, वडाप, लॉज, बिअर बार, खाजगी सावकारी यासह अनेक अवैद्य व्यवसाय पोलिसांच्या कृपाआशिर्वादाने राजरोसपणे सुरू आहेत. ट्रॉफिक पॉईंट ठिकाणी तर अक्षरक्ष: प्रवाशांना वाटमारीसारखे लुटले जात आहे. क्राईम रेट वाढत असताना अनेक एजंटांमार्फत चिरिमिरी घेवुन काही प्रकरणे बाहेरच्या बाहेर मिटवली जात आहेत. इस्लामपूर शहरात मोबाईल चोरी, घरफोडी, वाहन चोरीचे प्रमाण वाढले आहे. या चोरांचा बंदोबस्त करण्यात पोलिसांना पुर्णतः अपयश आले आहे. चोरांना पोलीस सामिल आहेत काय? असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.
खाजगी सावकारीला कंटाळुन अनेकांवर गाव सोडण्याची वेळ आली आहे. शेतकर्यांच्या जमिनीचे वाद पोलिसांपर्यंत पोहचत असले तरी ज्या शेतकर्यांचा खिसा गरम त्याला न्याय व ज्याचा खिसा रिकामा त्याच्यावर अन्याय हे धोरण आमच्या शेतकरी बांधवांबद्दल पोलिसांचे आहे. ही परिस्थिती चिड आणणारी आहे. हे सर्व व्यवसाय दि. 15 मार्चपर्यंत बंद झाले नाहीत तर प्रसार माध्यमांना बरोबर घेवून सर्व अवैध व्यवसाय भाजपा पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते बंद करतील, असा इशारा शेवटी भाजपा पदाधिकार्यांनी दिला.
खाकी वर्दीतील कुठे गेली माणुसकी
शहरातील अनेक छोट्या-मोठ्या उद्योग व्यावसायिकांकडून पोलिसांना पैलवानी खुराक ही पुरवला जातो. मध्यंतरी तर हणमंत देवकर या पोलिसाने खाकी वर्दीला काळीमा फासला. पोलिसांच्यात लाज व माणुसकी नसल्याचा प्रत्यय आला. या विकृत पराक्रमामुळे पोलिसांबद्दल नागरिकांमध्ये प्रचंड चिड निर्माण झाली. हा वर्दीतला माणूस अधिकाराचा कसा गैरफायदा घेतो, याचा प्रत्यय संपुर्ण महाराष्ट्राला आला.
पालकमंत्री जयंत पाटील यांचा वाढता हस्तक्षेप
सांगली जिल्ह्यात पोलीस खात्याने तर आपण जनतेचे सेवक आहोत. हे विसरून पालकमंत्री जयंत पाटील यांच्या विरोधकांना लक्ष करण्याची सुपारी घेतली आहे. विरोधकांवर गुन्हे दाखल करणे, विरोधकांना पोलिसांच्या माध्यमातून वेगवेगळया गुन्ह्यात अडकवणे असे प्रकार सर्रास सुरू आहे. काही दिवसापुर्वी इस्लामपूर शहरात एक गुन्हा घडला. या गुन्ह्यातील अरोपींना अटक करण्यात आली. त्यांना या गुन्ह्यातून वाचवितो, तू राष्ट्रवादी पक्षात प्रवेश कर असे चक्क पोलिस अधिकार्याने धमकावले तर एका प्रतिष्ठीत व्यक्तीने पोलीस अधिकार्याला आमच्या घरी जेवायला या, असे निमंत्रण दिले. तुम्ही राष्ट्रवादी विरोधी भाषण करता त्यामुळे मी येऊ शकत नाही, असे उत्तर दिले. आपल्या खाकीवरील निष्ठा व रास्त कर्तव्य करुन समाजातील घटकांना योग्य न्याय द्यावा. अन्यथा पुराव्यासह वरिष्ठ अधिकार्यांकडे तक्रार करून पोलीस अधिकार्यांची निलंबनाची मागणी केली जाईल. पोलिसांच्या अनेक गैरकारभाराचे पुरावे असलेले व्हिडीओ उपलब्ध आहेत. ते योग्य वेळी जनतेसमोर दाखविले जातील, असा ही इशाराही उपस्थित पदाधिकार्यांनी दिला.
COMMENTS