Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजपने एकनिष्ठ कार्यकर्त्यांवर अन्याय करू नये

माजी नगराध्यक्ष वहाडणे यांचा भाजपला घरचा आहेर माजी मंत्री राम शिंदे व पालकमंत्री विखे पाटील वादात घेतली उडी

कोपरगाव प्रतिनिधी ः आयाराम पक्षात घेऊन एकनिष्ठ कार्यकर्त्यांवर अन्याय करू नका असे मी अनेकदा ओरडून सांगितले, तेंव्हा भाजपातील एका कंपूने मलाच बाजू

राष्ट्रीय महामार्गावर गतीरोधक बसवण्याची वंचितची मागणी
माणसांच्या जगण्याची सुसंगत साहित्य मनाला भिडते ः चंद्रकांत पालवे
अहमदनगर जिल्ह्यात 30 मेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

कोपरगाव प्रतिनिधी ः आयाराम पक्षात घेऊन एकनिष्ठ कार्यकर्त्यांवर अन्याय करू नका असे मी अनेकदा ओरडून सांगितले, तेंव्हा भाजपातील एका कंपूने मलाच बाजूला सारण्याचा कुटिलपणा केला. जाहीरपणे बोलू नका असा शहाजोगपणाही मला शिकविला गेला. आज त्यांचीच अवस्था किती केविलवाणी झालेली दिसतेय असा सवाल कोपरगाव चे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी उपस्थित करत माजी मंत्री राम शिंदे यांचे नाव न घेता अगदी परखड शब्दात टीका करत पक्षाला घरचा आहेर दिला आहे.
भाजप पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आलेले दिवंगत माजी खासदार यांचे चिरंजीव गेल्या अनेक वर्षांपासून भाजपा चे एकनिष्ठ कार्यकर्ते आलेले कोपरगाव चे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी या वादात उडी घेत आपल्या प्रसिद्धी पत्रकात माजी मंत्री राम शिंदे यांचे नाव न घेता म्हटले आहे की, ज्यांना पक्षाने  अनेकदा आमदारकी-मंत्रिपद दिले, विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर विधानपरिषदही दिली तेच पक्षशिस्त मोडून आपल्याच खासदार-मंत्र्यांवर जाहीर दोषारोप करताहेत, ते कसे काय चालते. तुम्ही तर पक्षाचे जेष्ठ नेते आहात. तुम्हाला पक्षाच्या व्यासपीठावर हे सर्व मांडता आले असते. त्यावेळी मला पक्षाचे व्यासपीठ नसल्याने मी जनतेच्या न्यायालयात जाऊन न्याय मिळविला. तुमचे तर जवळचेही कार्यकर्ते दुसर्‍या पक्षात गेले. भाजपचा कुठलाही आधार नसतानाही आम्ही आजही स्वतःला भाजपाचेच मानतो. त्यामुळे तुमचे असे वागणे बोलणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. तुम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री असतांना निमंत्रण असूनही कोपरगावला यायचे जाणूनबुजून टाळले. त्यावेळी जिल्ह्यात भाजपाचे किती काम वाढले हे सांगा. रेडिमेड नेते पक्षात घेणे म्हणजे पक्षकार्य नव्हे. नामदार राधाकृष्ण विखे पाटील निदान त्यांच्या मतदारसंघात  जुन्या नव्यांचा मेळ घालून भाजपा संघटन मजबूत ठेवून आहेत. आज जिल्ह्यात भाजपचे किती आमदार मूळ भाजपचे आहेत याचा विचार करा. अजूनही वेळ गेलेली नाही.गरज असेल तर पक्षवृद्धीसाठी बाहेरच्यांना अवश्य प्रवेश द्यावा,पण संघ विचारांवर श्रद्धा ठेवून काम करणार्‍या कार्यकर्त्यांना निदान संघटनेत तरी सामावून घेतले पाहिजे.तुम्हाला जराशी अडचण झाली तर तुम्ही लगेच जाहीरपणे  वेदना मांडल्या.पण सामान्य कार्यकर्त्यांनी आपले मत कुणापुढे मांडायचे. जुने कार्यकर्ते अजूनही न्याय मिळेल या अपेक्षेत आहेत,याचा पक्षनेत्यांनी विचार करावा. मला व भाजपाचे कोपरगावमधील जुन्या कार्यकर्त्यांना आपण काय चूक केलीय हे आजपर्यंत समजलेले नाही.आमचा एकच दोष आहे. आम्ही कुणापुढेही नाहक झुकू शकत नाही. आम्ही चघळण्यासाठी पदांचे तुकडे मागत नसून आजही भाजपासाठी कुठलाही संघर्ष करण्याची आमची तयारी आहे हे लक्षात घ्यावे असा उपरोधिक टोला कोपरगावचे माजी नगराध्यक्ष यांनी माजी मंत्री राम शिंदे यांना लगावला आहे.

COMMENTS